top of page

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यात चर्चा

50 मिनिटांच्या चर्चेत, एकनाथ शिंदेंनी मायुतीमधील आपबिती मांडली

ree

नवी दिल्ली: राज्यात सध्या स्थाकिन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकार्‍यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्‍यावर होते, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.


राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास 50 मिनिट चर्चा झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्याकडे घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


विधानसभा निवडणूकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे, मात्र काही नेते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केला आहे. विरोधकांना यामुळे आयतं कोलीत मिळतंय, मीडीयात नाहक उलटसूलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे.


कार्यकर्ते पदाधिकार्‍यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापूढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्याने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती मिळत आहे. चव्हाणांकडून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचाव आरोप शिंदेकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

Comments


bottom of page