उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकर्यांच्या बांधावर; नांदेडमध्ये अजित दादांचे नाव घेत शेतकरी धाय मोकलून रडला, मी मराठवाड्याची लेक शेतकर्यांना भरिव मदतीचे अश्वासन

नांदेड : दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली आणि यंदा पावसाअभावी उभी पिके वाळून गेली आहेत. आम्ही जगायचं तरी कसं? आमच्यासमोर आता आत्महत्येशिवाय दुसरा पार्याय उरलेला नाही. आम्ही दादांच्या विश्वासावर होतो. आज दादा असते तर आतापर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी मिळाली असती, “ अशा शब्दांत दुष्काहाने होरपळून निघालेल्या शेतकर्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर हंबरडा फोडला. दुष्काळी परिस्थिचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज नांदेड दौर्यावर आल्या होत्या. जिल्ह्यातील सोनखेड लोहा येथे व्यथा मांडताना शेतकर्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी सुनेत्रा पवचार यांनी संबंधित शेतकर्यांना दिलासा देत शासनाकडून शक्य ती सर्व मदत करण्याचे अश्वासन दिले.
मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन कापूस यासह इतर पीकं करपून गेली आहेत. या संपूर्ण गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आल्या होत्या. लोहा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांत जाऊन त्यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पावसाने दडी मारल्यामुळे हाता- तोंडाशी आलेला खरीपाचा घास हिरावल्याने शेतकर्यांना अश्रू अनावर झाले. दादा असते तर कर्ज माफी मिळाली असती, कोरडा दुष्काळ जाहीर झाला असता अशी भावना शेतकर्याने व्यक्त केल्या. हे अश्रू शेतकर्यांच्या नुकसानीचे अश्रू होते. सरकार शेतकर्यांना सर्वतोपरी मदतर करणार असल्याचचे अश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार आनंद बोंढारकर यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली असून, शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी मराठवाड्याची लेक असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते. शेतकर्यांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकर्यांचे ज्या प्रकारे नुकसान झाले आहे. त्यांना त्यानुसार मदत देण्यात येईल. सर्व पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. असंही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, चारा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासन आवश्यक मदत करणार आहे. शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, लवकरच नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अश्वासन दिलं.
नांदेड जिल्ह्यात चार लाखाहून अधिक सोयाबीनचे नुकसान : पावसाअभावी नांदेड जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकांची वाढ झाली नाही. परिणामी पावसाअभावी पिके करपून गेली. कापूस पिकाचीही तीच अवस्था, सोयाबीन, कापूस पिकासह हळद, तूर, मूग उडीद पिकांचे देखील नुकसान झालं आहे. पावसाअभावी या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.



Comments