top of page

समृद्धी महार्गावर भीषण अपघात; आायटी अभियंत्यासह पत्नी, 7 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

5 hours ago
1 min read

छत्रपती संभाजीनगर: लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने आई-वडिलांना न सांगता अचानक भेटून ‘ सरप्राईज’ देण्यासाठी पुण्यावरून गावी जालन्याकडे निघालेल्या एका सुखी कुटुंबावर समृद्धी महार्गावर काळाने झडप घातली. नागपूर कॉरिडॉरवरील वेरूळ परिसरात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कारने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात पुण्यातील तरुण आयटी अभियंता पती, पत्नी व अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी (दि.26) दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक जगदारळे हे आपल्या कुटुंबासह एम एच 12 वायएस 1028 या क्रमांकाच्या कारने पुण्याहून जालन्याच्या दिशेने पहाटे 6 वाजता निघाले होते. समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर 449 (नागपूर कॉरिडॉर) जवळ पोहोचले असता चालकाला डुलकी आल्याने कारवरील ताबा सुटला. भरधाव कार समोरील जीजे 21 वाय 3362 या क्रमांकाच्या ट्रकला जाऊन पाठीमागून जोरात धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे ट्रकच्या खाली घुसून चक्काचूर झाला. कारमधील तिघेही गंभीर जखमी अवस्थेत आत अडकून पडले होते.


अपघाताची माहिती मिळातच महामार्ग संरक्षा पोलिस आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मदत पथकाने ‘ क्यूआरव्ही’च्या मदतीने कारचा पत्राव कापून तिघांना बाहेर काढले. मात्र तीव्र मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जगदारळे कुटुंबासह त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली असून समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र पुन्हा चर्चेत आले आहे.

Comments


bottom of page