top of page

एनडिएतील चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात!

मोदी सरकारला पहिला धक्का? आध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ



ree

मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितिश कुमार आणि चंद्राबाबु नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबु नायडू लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.


एकीकडे राहुल गांधींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुन्हा एकदा मोट बांधत ‘मतचोरी’ कॅम्पद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारबाबत मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे. या त्यांच्या दाव्यामुळे दिल्लीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावतीविषयी चर्चा न केल्याबद्दल घणाघाती टीका केल. ते म्हणाले की, राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याविषयी का बोलत नाही? कारण ते तर आमदारकीची निवडणुक हरले असल्याचं त्यांनी म्हटलं. राहुल गांधी आंध्र प्रदेशबद्दल चकार शब्द काढत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच राहुल गांधीविषयी आपण काय बोलावं, जे स्वत: प्रामाणिक नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला. यामागे चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मार्फत हॉटलाईनद्वारे त्यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला.


लोकसभा निवडणुकीत‘ एनडिए’ ला बिहार आणि आंध्र प्रदेशातील दोन बाबूंनी वाचवले. एनडिएला लोकसभा निवडणुकीत एकून 292 जागा मिळाल्या असून 272 पेक्षा 20 जागा जास्त आहेत. सर्वाधिक 240 खासदार भाजपकडे आहेत. तर चंद्राबाबूंच्या 16 आणि नितीश कुमारांच्या 12 जागा अशा एकूण 28 जागा आहेत.


विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांचा मोठा घोटाळा केल्याचा आरोपानं खळबळ उडवली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केंद्रात आणि बिहारमध्ये भाजपसोबत आहेत. नितीश कुमार हे एनडिए सरकारमधून कधीही बाहेर पडू शकतात, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात असतो.

Comments


bottom of page