एपस्टाईन फाईल्स प्रकरण: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत?, आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
- Navnath Yewale
- Dec 22, 2025
- 1 min read

अमेरिकन फायनान्सर तसेच लैंगिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईन यांच्या संदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक होताच अनेकांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हजारो कागदपत्रं आणि शेकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र यातील काही कागदपत्रं ही काळी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा जबाब आणि चौकशी अहवालाचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जे डॉक्युमेंट्स रिलिज करण्यात आले होते, त्यातील 550 पेक्षा जास्त कागदपत्रं ही काळी करण्यात आली होती. पीडित मुलींची ओळख लपवण्यासाठी ही कागदपत्रं काळी करण्यात आली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमेरिकन न्यायालयातील कागदपत्रानुसार जेफ्री एपस्टीन याने कथितरित्या डोनाल्ड ट्रम्प यांची भेट एका 14 वर्षाच्या मुलीशी घालून दिली होती. कोर्टाच्या रेकॉर्डनुसार एपस्टीन याने 1990 च्या दशकात फ्लोरिडा स्थित रिसॉर्टमध्ये 14 वर्षाच्या मुलीची आणि ट्रम्प यांची भेट घालून दिली होती. या भेटीमध्ये एपस्टीन याने ट्रम्प यांना कोपखिळी मारत त्या मुलीकडे इशारा करत चांगली आहे ना? असं हसत हसत म्हटलं होतं. तर एपस्टिन यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी देखील हसत हसत सहमती दर्शवली होती.
जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध फायनान्सर होता, त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप आहेत, या हायप्रोफाईल प्रकरणात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नाव समोर आली आहेत. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.



Comments