top of page

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून अदित्य ठाकरेंचा सरकारला अल्टीमेट एमपीएससी च्या दारात आंदोलनाचा इशारा; आंदोलनास दिग्गजांचा पाठिंबा

8 hours ago
2 min read

पुणे : एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंंदोलन सुरू आहे. महात्मागांधी जयंती दिनी (दि.7, ऑक्टोबर) पासून पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज सहावा दिवस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनास राज्यातील विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे नेते भेटी देवून पाठिंबा देत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार अदित्य ठाकरे यांनी आंदोलनास भेट देवून पाठिंबा दिला.


पुण्यातील एस एम चौकात सहा दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास राज्यभरातील विरोधी पक्षांसह सत्ताधारी नेत्यांनी पाठिंबा दिला. मागण्यांवर ठाम उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने रोहित पवार, अदित्य ठाकरे विश्वजीत कदम, रोहित पाटील यांच्या आग्रहास्तव उपोषण कर्त्याने सलाईन घेण्यास संमती दर्शविली. आंदोलकांची प्रकृती ढासळत असतानाही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असनल्याचा आरोप करत सकाळी आंदोलनकर्त्यांनी स्वप्नांची प्रतिकात्मक तिरडी सजवून अंत्ययात्रा काढली. पुणे शहरात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आयोगाने पेपर फोडून चुराडा केल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला.


दरम्यान विद्यार्थी आंदोलनामध्ये तीन गट निर्माण झाले असून अलका चौक, आहिल्याबाई होळकर लॅबरीसमोर, एस.एम. जोशी चौक अशा तीन ठिकाणी वेगवेगळे आंदेालनं सुरू आहेत.

वेगवेगळ्या आंदोलनावरून राजकीय पुरस्कृत आंदोलनाचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.


दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एस.एम.चौकात सुरू असलेल्या आंदोलनास राज्यातील दिग्गजांनी भेटी देवून पाठिंबा दर्शवला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथक बन यांनी पत्रकार परिषद घेवून पुण्यातील विद्यार्थी आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत असल्याचा आरोप करत आंदोलनासाठी बारामती येथून लोकांना बोलावल्याचा आरोप करण्यात आला. यावर आंदोलक विवेकानंद पाटील यांनी नवनाथ बन यांचा चांगलाच समाचार घेत “ नवनाथ या नावाचा अर्थ काय? नाथ सांप्रदयाचा उगम आणि हेतू, त्याचबरोबर ज्ञाणेश्वरीतील ओवीप्रमाणे नाथसंप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे संबध याचा उलगडा बन यांनी करावा अन्यथा नावाचा अर्थ कळत नसलेल्यांना नाव लावण्याचा अधिकार नाही” जोरदार पलटवार केला.


भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोनलावरून रोहित पवार यांच्यावर टिका केली होती, आमदार चित्रा वाघ यांच्या टिकेला रोहिणी खडसे यांनी पलटवार केला, “ काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन, रेकॉर्ड करून विचित्रा ताई येते आणि सांगते एमपीएससीचे आंदोलन नौटंकी आहे. अगं बाई तू ये. तू येच. आदरणीय ताईंना 56 जण पायाला बांधून फिरण्याची सवय आहे ” असं म्हणत जोरदार प्रत्यूत्तर दिले. दिवसेंदिवस आंदोलनास राज्यसह देशभरातून पाठिंबा वाढत आहे. सीजेपीचे अध्यक्ष अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा देत तुम्ही महाराष्ट्र सांभाळा मी दिल्ली सांभाळतो“ दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” असं म्हणत मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा सल्लाही अभिजीत दिपके यांनी यावेळी आंदोलकांना दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (शिंदे) खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, अदित्या ठाकरे, शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार अमर काळे, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार अमोल कोल्हे, आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह आदी नेते पदाधिकार्‍यांनी आंदोलनास भेटी देवून पाठिंबा दिला.


सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहे, तुमच्या एकजुटीचा विजय निश्चित होणार आहे, आपल्याला भिमनवारांचा राजिनामा तर घ्यायचाच आहे पण ज्ञानेश कुमार यांचाही राजीनामा घ्यायचा आहे. मत चोर, चंदा चोर, पेपर चोर हे सगळे चोरांचे सरकार आहे. ही चोरांची व्यवस्था आपल्याला उलथून टाकायची आहे, येत्या दोन दिवसात जर भिमनवार चा राजीनामा नाही आला तर आपण मुंबईत एमपीएससीच्या दारात आंदोलन आंदोलन करू भिमनवारचा राजीनामा झाल्याशिवाय उठायचं नाही. मुंबईमधील नियोजनाची ग्वाही देत अदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाना साधला.

Comments


bottom of page