top of page

एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन

रास्ता रोको,चक्का जाम आंदोलनामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प; आरक्षणाच्या मागणीसाठी महिला, पुरुष, बालकंही रस्त्यावर

ree

धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे दीपक बोर्‍हाडे गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मागणीवर ठाम दीपक बोर्‍हाडे यांच्या आंदोलनाकडे सरकार दूर्लक्ष करत असल्याचा आरोप धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. आंदोलक दीपक बोर्‍हाडे यांच्या अहवानाला प्रतिसाद देत आज राज्यभरता धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले.


रावेरमध्ये धनगर समाजक आक्रमक

रावेरमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. रावेरमध्ये ओंकारेश्वर- बर्‍हाणपूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला. या आंदोलनामुळे वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्या धनगर बांधवांनी प्रचंड घोषणाबाजी केली. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या निवास्थानावर धनगर बांधवांनी ढोल बजाव आंदोलन करत मागण्याचे निवेदन दिले आहे.


परभणीत चक्काजाम

एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी जिल्ह्यात आनेक ठिकाणी आज चक्काजाम करण्यात आले. धनगर बांधवांनी शहरात परभणी- गंगाखेड रस्ता अडवला होता. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.


जळगावात वाहतूक ठप्प

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्या वतिने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी साखळी धरून मुंबई- नागपूर महामार्ग तब्बल एक तास रोखून धरला. आरक्षणाच्या मागणीसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये धनगर समाजाच्या वतिने आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. महिलांचा देखील या आंदोलनात सहभाग होता. कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यात आम्हाला आक्षेप नाही. मात्र, आम्हालाही आरक्षण द्यावे अशी मागणी योवळी करण्यात आली. या आंदोनलाच्या माध्यमातून जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोर्‍हाडे यांच्या अमरण उपोषणालाही पाठिंबा देण्यात आला.


सोलापूच्या करमाळ्यात रास्ता रोको

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतिने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अहिल्यागनर-टेंभुर्णी महामार्गावरील करमाळ्यातील मौलाली माळ येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी ढोल वाजवत धनगर समाजाकडून करमाळ्यात रस्ता आडवला. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे दीपक बोर्‍हाडे यांचे पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू असून सरकार याकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणाही यावेळी आंदोलकांनी दिल्या.


जालन्यात रास्ता रोको

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम करण्यात आला. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांनी सोलापूर-धूळे महामार्ग रोखून धरला होता. जामखेड फाट्यावर रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेतला होता. वडीगोद्री येथील धुळे- सोलापूर महामार्गावर धनगर बांधवांनी चक्काजाम केला. आंदोलनामुळे महामार्गवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


Comments


bottom of page