‘ऑपरेशन सिंदूर’: आजचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने 6-7 मे च्या मध्यरात्री जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. या कारवाईत दहशतवाद्यांचे नऊ ठिाकणे उद्धवस्त करण्यात आली . पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, कोटील आणि मुजफ्फराबादमध्ये हल्ले झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पहलगामवरील हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताकडून कडक पाऊले उचलण्यात आली. या हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संतापाचे वातवरण बघायला मिळाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. संपूर्ण देशातून लष्कराचे कौतुक केले जात आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी हे बोलताना म्हणाले की, सर्व भारतीयांकरिता हा दिवस अभिमानाचा आहे. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल आणि तो आज आपण घेतलेला आहे.
विशेष: ऑपरेशन सिंदूर हे नाव मला वाटते की, अधिक बोलके आहे. भारतीय सैन्याचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करू. एअर स्ट्राईक करुन दहशवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आली. यावेळी हे उद्धवस्त करतानचे पूर्ण शूटिंग करण्यात आल्याने कोणाला काही बोलण्यास जागा उरलेली नाही. यावेळी भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत.
सकाळपासूनच भारतीय सैन्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या हल्ल्यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अमित शहा यांनी देखील या ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली. राहूल गांधी यांनही भारतीय सैन्याचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कर अलर्ट मोडवर आहे. अशा बदलत्या घडामोडींमध्ये, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांची बैठक बोलावली आहे. सुरक्षेची पुर्णपणे काळजी घेतली जात आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. हे हल्ले पहाटे 1:30 च्या दरम्यान बहावलपूर, कोटली आणि मुफ्फराबादमध्ये झाले. यामध्ये पहिला हल्ला पीओके मधील बहावलपूर जैश-ए- मुहम्मद चे हेड कॉर्टर समजल्या जाणार्या मर्कज सुहानुल्ला याठीकाणी करण्यात आला. या हल्ल्यात हेड कॉर्टच्या मध्यभागी मिसाईल अटॅक करण्यात आल्याने हेड कॉर्टरच्या अक्षरक्ष: ठिकर्या उडाल्या. दूसरा हल्ला, मुदके येथील लष्करचा कॅम्प असलेल्या मर्कज तैयबा याठिकाणी. तिसरा हल्ला, ब्लेरा कला का सर्जन या ठिकाणी. चौथा हल्ला, सियालकोट येथील महमुदा जलाल याच्या दहशतवादी कॅम्पवर करण्यात आला. पाचवा हल्ला, मर्कज एलिहाबीज. सहावा हल्ला, कोटली येथील मर्कज हब्बास. सातवा हल्ला, कोटली येथील मर्कज शहील शाहिद. आठवा हल्ला, मुजफ्फराबाद सवाई नाला कॅम्प येथे तर नववा हल्हा मर्कज बिलाल कॅम्प येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशवादी संघटनांचा मोरक्या हाफिज सईद, मसूद अझहर व सय्यद सलाउद्दीन यांचे कंबरडे मोडले आहेत.
अवघ्या 24 मिनिटात ऑपरेशन फत्ते:
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर एकून 24 मिसाईलद्वारे हल्ला चढवला यामध्ये ब्रम्होस, स्क्राप्ट या अत्याधुनिक मिसाईलचा समावेश आहे. ही कारवाई भारताच्या तिनही सैन्यदलाने संयुक्तीक केली आहे. अवघ्या 23 मिनटात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम फत्ते करण्यात आली. मध्यरात्री 1:28 वाजता हल्ला चढवण्यात आला आणि 1: 58 वाजता फत्ते करण्यात आला.
‘ऑपरेशन सिंदूर’ चे देशभारत ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. प्रत्येक भारतीयांकडून सैन्यदलाचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments