ओबीसी नेत्यांची उद्याची बैठक वादळी ठरणार!
- Navnath Yewale
- Oct 3
- 1 min read

मुंबईत उद्या होणार्या ओबीसी समाजाच्या बैठकीत एकनाथ शिंदे, आणि गणेश नाईक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाच्या बैठकीला दोघेही उपस्थित राहणार आहेत. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर नवी मुंबईची वाट लागेल असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती, त्यानंतर आता शिंदे आणि नाईक उद्या आमने सामाने येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा सर्वश्रृत आहे. एका कार्यक्रमात नाईक यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली होती. आम्हाला ती 14 गावे आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुक झाल्यानंतर सर्व गावं आपण बाहेर काढू. निश्चित सर्व गाव निघतील, असा दावा त्यांनी केला. जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता गेली तर या शहराचे वाटोळे झाले म्हणायचे असा हल्लाबोल गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. अशातच आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे उद्या ओबीसी बैठकीला समोर समोर येत असल्याने ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.


Comments