top of page

ओबीसी मोर्चा पूर्वीच हाके, वाघमारेमध्ये फूट? परवानगी नसताना मोर्चा काढणं अतातायीपणा वाघमारेंचा सल्ला, उद्याचा मोर्चा होणारच हाकेंचं अवाहन

Aug 31
2 min read

बीड: ओबीसी आरक्षण वाचवण्याचा मुद्दा उपस्थित करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उद्या (दि.1 सप्टेंबर) रोजी मुंबईमध्ये ओबीसी मोर्चाचे आवाहन केले आहे. हाके यांचे सहकारी वकील मंगेश ससाने यांचा आझाद मैदान पोलिसांनी परवानगीचा आर्ज निकाली काढून मोर्चाला परवानगी नाकरली आहे. तर दुसरीकडे हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी परवानगी नसताना मोर्चा काढणं अतातायीच ठरणार असल्याचं म्हणत 1 सप्टेंबरचा मोर्चा स्थगित करण्याचं अवाहन केल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे.


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (दि.1 सप्टेंबर) रोेजी यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी मोर्चाची हाक दिली. लक्ष्मण हाके यांचे सहकारी वकील मंगेश ससाने यांनी आझाद मैदान पोलिसांत मोर्चासाठी परवानगीचा आर्ज सादर केला होता. आझाद मैदान पोलिसांनी वकील ससाने यांचा परवानगीचा अर्ज निकाली काढत मोर्चास परवानगी नाकरली. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके मोर्चावर ठाम आहेत.


ओबीसी बांधवांनी मोर्चासाठी मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन हाके यांनी केले. दोंड तालुक्यातील पाटस येथून मोर्चा मुंबईत धडकणार असल्याचं हाके म्हणाले. परवानगी मिळो अथवा न मिळो मोर्चा होणारच असा ठाम निर्धार करत हाके यांनी राज्यातील ओबीसींना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले असतानाच आता हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी मोर्चास विरोध केल्याचे समोर आलं आहे.


वाघमारे म्हणाले की, दि. 1 सप्टेंबरच्या ओबीसी मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकराली आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी युवकांवर पोलिस कारवायांची शक्यता आहे. समाजहिताच्या मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जर तरुणांवर केसेस दाखल होणार असतील आणि त्यांचे भवितव्य धोक्यात येत असेल तर त्याचा काय फायदा? दरम्यान, नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा संदर्भ देत युवकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे सरकारने अश्वासन देवूनही अद्यापपर्यंत रद्द केले नाहीत. सरकारमध्ये मराठा समाजाचं अधिक संख्येत प्रतिनिधित्व असतानाही त्यांच्या युवकांवरील गुन्हे सरकार मागे घेवू शकलं नाही.


ओबीसींचं प्रतिनिधत्व तोकडं त्यात युवकांवर गुन्हे दाखल झाले तर आपला आवाज उठवणारं कोणी नाही, त्यामुळे परवनगी शिवाय मोर्चा काढणं अतातायीपणाचं ठरेल. जरांगे प्रमाणे आतपण अतातायी पण करायचा म्हटल्यावर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असंही वाघमारे म्हणाले.


उद्याचा मोर्चा स्थगित करून राज्यातील ज्येष्ठ ओबीसी नेत्यांच्या सल्ल्याने पाच दहा लाखांचा मोर्चा कायदेशीर परवानगीने काढता येईल, त्यामुळे शक्यतो उद्याचा मोर्चा स्थगित करणं महत्वाचं आहे. पोलिसांची परवानगी नसतना मोर्चा अतातायीचं ठरणार असल्याचं सांगत वाघमारे यांनी एकप्रकारे हाके यांच्या मोर्चास विरोध दर्शवला आहे.

Comments


bottom of page