ओमकार उदावंत यांची ‘कोण बनेगा करोडपती’ हॉट सीटसाठी निवड
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

जव्हार: तालुक्यातील सुप्रसिद्ध सराफ-ज्वेलर्स व्यापारी . ओमकार राजेंद्र उदावंत यांची लोकप्रिय दूरदर्शन कार्यक्रम ‘कोण बनेगा करोडपती’ (KBC) च्या हॉट सीटसाठी निवड झाल्याची आनंदाची बातमी समजताच तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या निवेदन शैलीमुळे देशभर गाजणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होणे हे अनेकांसाठी स्वप्नवत असते. लाखो अर्जदारांमधून कठोर परीक्षेनंतर निवड होणाऱ्या काही भाग्यवानांमध्ये जव्हारचा तरुण उद्योजक व व्यापारी म्हणून ओळख असलेल्या ओमकार उदावंत यांचे नाव झळकले आहे.
लहानपणापासून शिक्षणाची गोडी असणारे, उदावंत कुटुंबाने व्यापार क्षेत्रात प्रामाणिकपणा, गुणवत्ता व ग्राहकांचा विश्वास या तीन आधारस्तंभांवर ठसा उमटवला आहे. व्यापारी क्षेत्रासोबतच सामाजिक कार्य, शैक्षणिक मदत व धार्मिक उपक्रमात ओमकार उदावंत सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यामुळे स्थानिक समाजात त्यांना मान्यता व प्रेम लाभले आहे.
ओमकार यांची KBC हॉट सीटवर निवड झाल्याने जव्हार तालुक्याचा मान उंचावला असून, नागरिकांनी सामाजिक माध्यमांतून आणि प्रत्यक्ष भेटून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. व्यापारी वर्ग, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्यांनी “ओमकार उदावंत आपल्या ज्ञान, आत्मविश्वास व मेहनतीच्या बळावर उत्तम कामगिरी करतील” असा विश्वास व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे जव्हार शहरात आनंदाचे वातावरण असून, उदावंत कुटुंबीयांबरोबरच संपूर्ण तालुक्यासाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे.



Comments