कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी शिक्षिकेचे निलंबन
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनात अनेक जण सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्यसा एका शिक्षिकेला आपली नोकरी गमवावी लागली आहे.
दिल्लीत झालेल्या आंदोलनात हरियाणातील रोहतकमधील शिक्षिका सुलेखा दलाल या सहभागी झाल्या होत्या. रोहतकच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकार्यांनी बुधवारी सुलेखा दलाल यांना 8 जूनपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशात त्यांच्या निलंबनाचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दलाल या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणत होत्या की, ही करो या मरोची लढाई आहे. कॉकरोचची आई मैदानात उतरली आहे. आम्ही आमच्या मुलांसोबत आहोत.
सुलेखा दलाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. त्यामुळे एक आई म्हणून फक्त विनंती केली होती. दरम्यान, सुलेचा दलाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.
आज पुण्यात आंदोलन : नीट पेपर फूटीनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीनंतर आज पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत असलेल्यसा या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.



Comments