top of page

तुम्ही खूप त्याग केला , मी तुचमी इच्छा पुर्ण करु शकले नाही...नीटमध्ये मार्क कमी पडले चिठ्ठी लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या आहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील घटना

Jul 28
2 min read

आहिल्यानगर: महाराष्ट्राच्या अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील एका 18 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेवून जीवन संपवलं. अंकिता सांगळे असं मृत मुलीचं नांव आहे. कुटुंबियांनी दिलेल्या महितीनुसारप, नीट परिक्षेत गुण कमी मिळाल्यामुळे ती निराश होती. अंकिताच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मीत मृत्यूची नांदे करून तपास सुरू केला आहे. अंकिताचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. नीअ परिक्षेची ती दीर्घकाळापासून तयारी करत होती. अलीकडेच जाहीर झालेल्या निकालामध्ये तिला 166 गुण मिळाले होते. अंकिताला यापेक्षा जास्त गुणांची अपेक्षा होती. कमी गुण मिळाल्यामुळे ती तणावाखाली होती. याच मानसिक दबावामध्ये तिने जिवन संपवण्याचा निर्णय घेतला.


अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबीयांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली होती. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासाठी गेली होती. बराचवेळ झाला तरी अंकिता बाहेर आली नाही. म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडला. त्यावेळी आतलं दृष्य पाहून सगळेच हादरले.अंकिताने गळफास घेवून जीवन संपवून घेतलेलं होतं. तत्काळ पोलिसांना घटेनेची माहिती देण्यात आली.


“ माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा” : अंकिताने तिच्यामागे एक चिठ्ठी सोडली, त्यात तिने लिहिलं की, “ तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, पण मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकली नाही. आई तू तर प्रत्येक अडचणीत मैत्रीण बनून माझी साथ दिलीस. दादा तू सुद्धा मला साथ दिलीस. माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही मला जो आनंद दिला, तो मी कधीच विसरु शकत नाही” “ दाद तू आई-बाबांची काळजी घे, त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस, तू सुद्धा आनंदी राहा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला कुठला आनंद देऊ शकले नाही. मी आधी जेव्हा नीटचा अभ्यास करत होती, त्यावेळी तुम्ही त्याग केलात आणि मी काय केलं, तुमची इच्छा मी करू शकले नाही. आनंदी रहा. तुमची अंकिता. ” असं अंकिताने चिठ्ठीत लिहिलं आहि. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहे.


खासदार लंके यांनी या घटनेस सरकारला जबाबदार धरलं: राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) गटाचे खासदार निलेश लंंके यांनी अंकिताच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. लंके यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरलं आहे. नीट परीक्षेची संबंधित वाद आणि पेपर लिकची निष्पक्ष चौकशी वेळेत पूर्ण झाली असती तर कदाचित अशा घटना टळल्या असत्या असं निलेश लंके म्हणाले.

Comments


bottom of page