कॉक्रोज जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची रुपरेषा जाहीर !
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुण हे झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या पक्षाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाई विविध प्रश्न घेऊन ही पार्टी मैदानात उतरली आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त सोशल मीडियावर सक्रिय होता मात्र आता शिनवारी 6 जून रोज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. मराठी तरुण असलेल्यास अभिजीत दीपके या तरुणाने या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या आंदोलनाला स्वत:अभिजीत दीपके हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीकडून अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे.
देशभरातून आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. विमानतळावर गर्दी टाळण्यासाठी समर्थकांना विमानतळावर न येण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे. सर्व समर्थकांनी 6 जून रोजी सकाळी 9 वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्यात जमावे अभिजीत दीपके विमानतळावरुन थेट संसद मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचणार आहेत. जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात येणार आहे.
आंदोलन संविधानिक, लोकशाही मार्गाने आणि शांततेत पार पाडण्यावर भर राहील, सहभागी नागरिकांना शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनात राष्ट्रीय ध्वज आणि पुस्तके सोबत आणण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कोणताही संशयास्पद किंवा गैरप्रकार दिासल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्योच निर्देश, हवामानाचा विचार करून पाणी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन,ट्रोल भडकावू व्यक्ती किंवा आंदोलन बिघडण्याचा प्रयत्न करणार्यांपासून दूर राहण्याचे आवाहन. आंदोलनाची माहिती इतर समर्थकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने करण्यात आलं आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या आंदोलनाला कसा मिळतो? आंदोलनाची गर्दी पाहणं महत्वाचं ठरणार आहे.