top of page

कटाचा सुत्रधार धनंजय मुंडेच, सीआयडी, ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट ची मीच मागणी करतोय पुन्हा पत्रकार परिषद: जरांगे पाटलांनी पुरावेच दाखवले!


आंतरवाली: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी पत्रकार परिदेद्वारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळले. जरांगे पाटील याच्या आरोपाचं खंडन करत मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकरणाची सीआयडी चौकशी करून ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्टची मागणी केली.


दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्यूत्तर देत जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेच कटाचा सूत्रधार असल्याचे सांगत संशयित आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यातील कथीत ऑडिओ क्लिप ऐकवली. शिवाय मीच आता नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग आणि सीआडी चौकशीची मागणी करणार असल्याचा इशारा देत धनंजय मुंडे यांचे आव्हान स्वीकारल्याने राज्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.



मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातापाताच कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची पोलिसांकडून कसून चौेकशी सुरू आहे. त्यातच आज जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच घातपाताचा कट रचल्याचा खुलासा केला.


आमच्या जवळच्या माणसांकडून धनंजय मुंडेनी माझ्या हत्येचा कट शिजवला. बनावट व्हिडिओ तयार करून बदनामी करायची, ताफ्यामध्ये वाहन घालून अपघात घडवून आणायचा किंवा जेवनामध्ये गोळ्या द्यायचा अशा प्रकारचा कट शिजल्याचा खुलासा जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषदेत केला.


दरम्यान, जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांचे सर्व आरोप फेटाळले. जरांगे पाटील आणि माझा बांधाला बांध नाही, मराठा आरक्षणासाठी जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेमध्ये मी पहिला ठराव घेतला. जरांगे पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप निरर्थक आहेत. आता या प्रकरणाचा दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे. त्यासाठी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सीआयडी चौकशीसह आमच्या दोघांचीही ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट करण्याची मागणी करणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.


धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेच या घातपाताच्या कटाचा सुत्रधार असल्याचा दावा करत पोलिसांच्या ताब्यातील संशयित आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपच ऐकवली. धनंजय मुंडे हा नस्तीक प्रवृत्तीचा माणुस आहे.


पोलिसांच्या तब्यातील संशयित आरोपीमधील आपसातील संवादाची क्लिप ज्यामध्ये पैशाच्या डिलवर संभाषण शिवाय धनंजय मुंडे आणि एक आरोपी यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप आहे.यामध्ये आणखी बर्‍याच जणांचा समावेश असून कांचन हा पी.ए. का कार्यकर्ता यानेच संशयित आरोपीला परळीला नेलं, आणि इथुनच कटाची सुरूवात झाल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. विचाराची लढाई विचाराने लढायला हवी. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं नास्तीक वृत्तीने लोकांना संपवायचं. याचे आणि आरोपीमधील संवादाचे सीडीआर काढा.


भाऊबीजीच्या दिवशी आरोपी आणि यांच्यात काय संवाद झाला हे ही लोकांच्या समोर आलं पाहिजे. तपासाचा भाग म्हणून मी काही गोष्टी समोर आणणार नाही, आम्ही सर्व ऑडिओ, व्हिडिओ क्लिप जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवल्या आहेत.


हा (धनंजय मुंडे) पंकजा मुंडे या बहिणीबद्दल काय बोलतो, स्वत:च्या बायको बद्दल काय कारस्थान रचतो. हे प्रकरण खूप गंभीर आहे. हलक्यात घेण्यासारखं नाही, जीवन मरणाचा प्रश्न आहे.


घटनेतील सर्व सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी करतो नार्कोटेस्ट साठी ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या घ्या, पहिल्यांदा माझी नार्कोटेस्ट करा, नंतर त्याची (धनंजय मुंडे) याची करा. सीआयडी चौकशी, एसआयटी चौकशी आणि ब्रेन मॅपिंगची सुरूवात माझ्यापासून करा मी स्वत: उद्या तसा अर्ज देणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

Comments


bottom of page