top of page

सत्तास्थापनेसाठी एमआयएमच्या आमदाराने घेतली मंत्री दादा भुसेंची भेट; मालेगावच्या महापालिकेच्या राजकारणात ट्टिस्ट


नाशिक: चंद्रपूरसह राज्याचं लक्ष लागलेल्या मालेगाव महापालिकेतही कोणाची सत्ता स्थावन होणार, कोण महापौर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विशेष म्हणजे येथील महापालिकेत भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा गट स्थापन केला होता. या गटाची नोंदणी 30 जानेवारीला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर या गटाची नोंदणी करू नये असा अर्ज भाजपच्या नगरसेवकांनी दिला.


त्यामुळे मालेगावमध्ये कोणता पक्ष महापौर पदासह सत्तेत असेल हे अद्यापही ठरलेलं नाही. त्यातच आता एमआयएमच्या आमदाराने शिवसेना नेते तथा मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याने एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. मालेगावात इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्ई यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणुक लढवली होती. त्यांच्याकडे दोन्ही पक्षाचे मिळून 40 नगरसेवक आहेत. तर बहुमताचा आकडा 43 आहे.


मालेगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळेल अशा जागा मिळालेल्या नाहीत. मालेगावात इस्लाम पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणुक लढवली होती. त्यांच्याकदे दोन्ही पक्षाचे मिळून 40 नगरसेवक आहेत. मालेगाव महापौरपदासाठी 7 फेब्रूवारीला निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सत्तास्थापनेसाठी 42 हा बहुमताचा आकडा असून सेक्यूलर फ्रंटला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा महापौर मालेगावात बसू शकतो. तर, दुसरीकडे एमआयएमनेही जुळवाजुळव सुरु केल्याचं दिसून येत आहे.


महापालिकेत एमआयएमचे 21, इस्ला पार्टीचे 35, शिवसेनेचे 18, भाजपचे 2, व काँग्रेसचे 3 असे एकूण संख्याबळ आहे. महापौरपदासाठी 43 चा आकड ‘मॅजिक’ आहे. त्यामुळे काँग्रेसकडील 3 नगरसेवक मालेगाव महापालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मात्र, इतर पक्षाकडून निवडून आलेले काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याचेही सध्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मालेगाव महापालिकेसाठी वेगवान घडामोडी घडू शकतात.


दरम्यान स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मालेगावी सर्वपक्षीय शोकसभेचे आयेाजन करण्यात आले होते. या सभेत मोठ्या सख्येने नागरिक देखील उपस्थित होते. मंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगाव मध्येच माजी आमदार असिफ शेख यांनी देखील अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

Comments


bottom of page