करुणा शर्मा-मुंडेकडून पतीचं कौतुक; गोपीनाथ मुंडेचे खरे वारस धनंजय मुंडेच!
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात वादळ निर्माण करणार्या त्याच्या पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी आज चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. वारसा पोटातून नाही, तर विचारातून जन्माला येतो, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत. अशा शब्दात करूणा मुंडे यांनी भुजबळांच्या विधानाचे समर्थन केले. गोपीनाथ मुुंडे यांनी जसे जनतेत जाऊन आपले स्थान निर्माण केले, तसेच धनंजय मुंडे यांनीही कले, असे गौरोद्गारही करुणा मुंडे यांनी काढले.
बीड येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावे, असे म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून अंगावर आले तर शिंगावर घ्या, असे आव्हान आपल्या भाषणात केले होते. यावर करूणा मुंडे यांनी हिंमत असेल तर मला शिंगावर घ्या, असे चॅलेंज दिले होते.
ओबीसी मेळावा आणि त्यातील धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांच्यातील संघर्ष चिघळला होता. विशेषत:करूणा मुंडे अधिक आक्रमक झाल्या होत्या. छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. आज याच विषयावरून करुणा मुंडे यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत, 2009 ते 2019 दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला, त्यात मी ही होते, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो, आणि आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरामध्ये वाद झाला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेसारखच तळागळामध्ये जाऊन स्वत:चे व्यक्तिमत्व निर्माण केलं. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत. आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा.
धनंजय मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपचा हात होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं. त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या, त्यावेळी एक भाऊ म्णणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं आणि दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे.
आज एक नवीन पार्ट सुरू झाला आहे. मी प्रॉपर्टी विकून माझे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवून या संघार्षामध्ये सहभागी झाले होते. पंकजाताई आज जरी म्हणाल्या मी वारसदार आहे, मुंडे साहेबांची तर नाही, धनंजय मुंडे हेच खरे राजकीय वारस आहेत. याचा पुनरुच्चार करुणा मुंडे यांनी केला. एकूणच धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या करुणा मुंडे यांनी अचानक नवर्याचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.



Comments