पुण्यात मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंन्ट्री ! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेबाबत सकारात्मक, बैठकीत चर्चा; लवकरच घोषणा
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 1 min read

पुणे: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आधाडीमध्ये सामावून घ्यायंच की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक घेण्यात आला आहे.
बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. या चर्चेत मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा विषय केंद्रस्थानी होता. चर्चेदरम्यान सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांनी याबाबत आपली भूमिका मांडली.
पुण्यामध्ये मनसेला सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सकारात्मक असल्याचा पहावयास मिळत आहे. राज्यातील समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणुक लढण्याचे आदेश वरिष्ठांनी आम्हाला दिले असल्याचं शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या महाविकास अघाडीसोबतच मनसे सोबत ही जागा वाटपाच्या चर्चा सुरू केल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीने मनसेबाबत कोणताही निर्णय घेतला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युती ही निश्चित असल्याचं बोललं जात आहे. मनसेसोबत युतीच्या चर्चा करण्याच्या सूचना आल्या असल्याचे ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे आणि संजय मोरे यांनी सांगितले.
वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याचा काँग्रेस नेते सकारात्मक दिसत नाही, मात्र, स्थानिक पातळीवर पुणे काँग्रेस मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कोणासोबत करायची याबाबतचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. जे सत्तेमध्ये नसतील अशा सर्व पक्षांसोबत युती करण्याबाबत आम्ही सकरात्मक आहोत.
लवकरच घोषणा: महाविकास आघाडीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये मनसेला पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यास तिन्हीही पक्ष सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यामध्ये तरी मनसे महाविकास आघाडीचा भागस असण्याची शक्यता आहे. लवकरच या बाबात अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.



Comments