काँग्रेसची जनसंपर्क मोहिम जव्हारमध्ये गावभेटींना प्रतिसाद
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

जव्हार: जव्हार तालुका काँग्रेस आयोजित राजेवाडी येथील गाव भेटी चा व युवा कार्यकर्ता जनसंवाद कार्यक्रमाचे (दि.11) आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेवाडी येथील काँग्रेसचे बहुसंख निष्ठावान कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वसमावेशक असून आदिवासी बांधवांच्या हिताची असल्याचे यावेळी समजावून सांगण्यात आले.
प्रत्येक कुटुंबाकडून जीएसटी च्या रूपात वर्षाकाठी जवळजवळ एक लाख रुपये पर्यंतचा कर वसूल करून केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांना फक्त 12 हजारांची तुटपुंजी मदत करतं अशा विविध फसव्या योजना सांगून आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यामध्ये पटाईत असलेल्या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी, बुथ कार्यकर्त्यांनी या वेळेला बरेच वर्ष न मिळालेली काँग्रेसची निशाणी हाताचा पंजा हर घर पंजा गाव गाव पंजा अशा प्रकारच्या नारा दिला .
लढेंगे जितेंगे अशा घोषणा युवा कार्यकर्त्यांनी दिल्या. या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, आदिवासी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष बळवंत गावित, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, जव्हारचे तालुका संपत पवार आदिवासी काँग्रेसचे जव्हार व मोखाड्याचे तालुकाध्यक्ष अशोक वाघ व राम कडाळी या सर्वांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन तालुका उपाध्यक्ष बरतड यांनी केले . सूत्रसंचलन माजी सरपंच भला यांनी केले या कार्यक्रमास माजी सरपंच सखु ताई बेंडकोळी, आंबेकर साहेब व शंकर झुगरे साहेब आवर्जून उपस्थित होते.



Comments