कार्यवाही चालू राहील, जगण्यासाठी साधन-सामुग्रींची पुर्तता करा- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Sep 16
- 2 min read
जरांगे पाटीलांनी आष्टी तालुक्यातील पुरग्रस्तभागाची पाहाणी, पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आश्रू आणावर, सरकसट पंचनामे, शेतकरी सांगतील तशा पशुधनाच्या नोंदी घ्या तातडीने मदतीची मागणी

कडा व परिसरामध्ये ढगफूटीसदृश्य मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसला त्यात व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाले. शेत शिवारातील शेतीपीके भुईसपाट झाली, राहती घरे पाण्याखाली गेल्याने संसारपयोगी साहित्यांसह जीवनावश्यक वस्तु पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. शहर परिसरातील दहा गावातील काही नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साह्याने रेस्क्यू करण्यात आले. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करत कृषी मंतभ दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवर संवाद साधत नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून तातडीची मदत देण्याची मागणी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळभच आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणीला सुरुवात केली. धामगाव येथील नागरिकांशी संवाद साधला.पुराच्या पाण्यामुळे धान्य, संसारपयोगी साहित्य वाहून गेले, कसा बसा जीव वाचवल्याच्या व्यथा येथील नगारिकांनी मांडल्या. घाटा पिंपरी, दादेगाव, डोंगरगण, टाकळी, कडा, शिराळा, टाकळसिंग,हिंगणी येथील बाधीत क्षेत्रांची पाहाणी करत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.
जरांगे पाटील यंत्रणेच्या अधिकार्यांना म्हणाले की, पंचनामे करताना शेतकर्यांचे सरसकट नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करावा. शासनाकडून मदत कशी मंजूर करायचे हे मी पाहून घेतो, असे म्हणत त्यांनी पुरग्रस्तांना धीर दिला. दरम्यान, यावेळी जरांगे पाटील यांनी कडा येथे पुरामध्ये आडकलेल्या सापते कुटुंबाची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. पुरात अडकल्याने समस्यांना तोंड द्यावी लागली हे ऐकून जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले.
कडा शहरातील छोट्या, मोठ्या व्यवसायिकांचे पुराच्या पाण्यात साहित्य वाहून गेले त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाले. सर्व व्यवसायिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
पुरग्रस्तांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांना पाहून महिलेने जरांगे पाटील यांना मिठी मारून टाहो फोडला.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात शेतकर्यांचे पशुधन वाहून गेले आहे. याचे पंचनामे करताना पशुधन अधिकारी हे मृत जनावर दाखवून त्याचे शवविच्छेदन करावे लागेल असे सांगत असल्याची तक्रार शेतकर्यांनी करताच त्यावर जरांगे पाटील संतापून म्हणाले की, पुरामध्ये वाहून गेलेले जनावरं पंचनामा करण्यासाठी कुठून आणायचे? याचा शासनाने विचार करून शेतकरी जी संख्या सांगेल त्या संख्येप्रमाणे नोंद घेऊन जनावरांची भरपाई द्यावी.
सरकारने व्यवसायिक,शेतकर्यांना खचून जाऊ देवू नये, नुकसानग्रस्तांनी पुन्हा नव्या उमेदीने व्यवसाय, शेतीसाठी तयार रहावे असे अवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले. दरम्यान ठिकठिकाणच्या पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतांना जरांगे पाटील वारंवार भावूक होत असल्याचे दिसून आले. पाहाणी करत असताना जरांगे पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे याच्याशी फोनवरुन संवाद साधत बाधीत क्षेत्रातील शेतीपीकांसह नुकसानग्रस्त व्यवसायिक, शेतकर्यांना तातडीच्या मदतीचे आवाहन केले. शासन,प्रशासनाने कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली असली तरी जगण्यासाठी लागणार्या साधन समाग्रीची तातडीने पुरतता करण्याची मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह यंत्रणेच्या अधिकार्यांकडे केली.



Comments