कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

सोलापूर : सरकार जसा त्रास मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे. तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर, शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिला आहे. मात्र, हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवांचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे, असा आक्रमक सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षण मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोनाच्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर आहे. आज सोलापूर शहर, पंढरपूर, माढा, वैराग, सांगोला, सरकोली, वडाळा या ठिकाणी जाहीर सभा व संवाद बैठका घेतल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. मंत्री बावनकुळे यांच्यावर त्यांनी व्यंगात्म टीका करत कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे मंत्री बावनकुळेच असल्याचे सांगत त्यांनी सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षण मुद्यावर जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील म्हणाले की, तीन वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कट रचले, शेवटच्या टप्यात मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा कच शिजला. तीन वर्षापूर्वी सरकारने नोंदी शोधल्या त्यांनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले. नोंदी शोधल्या सरकारच्या समितीने त्याच नोंदीनुसार मिळालेले कुणबी प्रमाणपत्र बावनकुळे यांच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप केलं.
मराठवाड्यात मिळालेल्या नोंदीमुळे 2.50 कोटी मराठा बांधव आरक्षणात गेला. सरकारने डोकं लावलं आणि गॅझेटिअर म्हटलं तर मराठा सगळाच आरक्षणात जाणार. एकट्या कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटीअरमध्ये जवळपास तीन लाख नोंदी आहे आणि ते लागू केलं तर 6 कोटी मराठा आरक्षणात जाणार. म्हणून त्यांनी मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मिळालेलं प्रमाणपत्र टिकणार नाही असा गैरसमज पसरवण्याचा कट रचला. किमान चार नोंदी रद्द करून मीडिया ट्रायल करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. मी कलेक्टर साहेबांना विचारलं की प्रमाणपत्र देण्याचं का रोखलं, त्यावर कलेक्टर म्हणाले मंत्री बावनकुळे यांनी पत्र काढलं आहे. की पाच दिवसांच्या आत मराठ्यांना दिलेले प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र असल्याचं कलेक्टरांनी सांगितलं. बावनकुळे कुठून आला काय कळत नाही, हडप्पा, मोहेजोदडो, वेरुळच्या लेण्यावर कोरलेल्या शिल्पासारखा दिसत असल्याची व्यंगात्मक टीकाही यावेळी जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षण आंमलबजावणीस चालढकल केली तर सरकारला 2029 च्या निवडणुकांत गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.
मी मराठा समाजाला माय- बाप मानलंय, एखाद्या मुलासमोर माय- बापाचा आपमान होत असेल तर तो शांत बसणार का?, नाही ना, म्हणून मी कचाकच त्यांना घोडे लातोय. आता शेवटचां लढा उभा करायचा आहे. आता तुकडाच पाडायचा काही झाला तरी पाचही गॅझेट घेतल्याशिवाय मागे हाटणार नाही त्यासाठी तुम्ही 29 ऑगस्टला एकानेही घरी न थांबता सगळ्यांनी आंतरवाली सराटीला यायचं असं अवाहनही त्यांनी केलं.



Comments