top of page

सरकारने चुक मान्य करून सुधारणा करावी,..अन्यथा मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

सांगली : मराठा आरक्षण मुद्यावरून जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. राज्यभरात मराठा समाजाशी संवाद साधत त्यांना आंदेालनाच्या रननितीबाबत माहिती देत आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये निर्णायक आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण संवाद दौरा सुरू आहे. आज सांगलीतून त्यांनी पुन्हा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करत सरकारला मोठा इशारा दिला आहे.


सरकारने कुणबी प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सांगलीतून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारला इशारा दिला आहे. सांगलीतील संवाद सभेदरम्यान जोरदार पाऊस सुरू असताना उपस्थितांनी डोक्यावर खुर्च्या घेत पावसापासून संरक्षण करत जरांगे पाटील यांची सभा ऐकली. उपस्थितांना संबोधित केल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांसी संवाद साधला.


जरांगे पाटील म्हणाले की, नोंदणी अवैद्य करा म्हणून त्यांनी बावनकुळेंनी सांगितलं. त्यांची पत्रावर सांकेतिक भाषा आहे. मलाव मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएसने सांगितलं. ‘अ’ लिहीलं म्हणजे या मागणीला प्रथम प्राधान्य द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. तसेच अधिकार्‍याने काय कारवाई केली त्याचा प्रस्ताव पाठवायचा असतो. तुम्ही हस्तक्षेप करत नाही तर मग प्रस्ताव का मागितला? त्वरीत प्रस्ताव का मागवला? अवैध करून प्रस्ताव मागितला आहे. तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या. तुम्ही चुकले आहात. तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागू शकते. मुख्यमंत्र्यांनी अजूनही आमच्या मंत्र्यांकडून चुक झाल्याचे सांगून चुक दुरुस्ती करावी. वेळ गेलेली नाही, त्यांनी चुक दुरुस्त करू नये. मराठ्यांचं वाटोळं करावं, मग त्यांना कळेल मी खूप ताकदीचं आदोलन करणार आहे. सुट्टीच नाही त्यामुळे चुक दुरुस्त करा, अन्यथा पुन्हा मुंबईकडे कूच करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले. सरकार जातपडताळणी समितीत हस्तक्षेप करत नाही. सरकारला अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काम करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मीडियावर म्हणाले होते. मग बावनकुळेंना कोर्टानं इंडोसमेंट करण्याचे अधिाकर दिले आहे का? किती वेड्यात काढणार आहात? हा सरकारचा हस्तक्षेप नाही का? मग बावनकुळेंचं पत्र काय आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.


मराठा समाज पेटून उठला आहे. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये. मराठा समाजावर अन्याय होऊ नये. ही इच्छा आहे. मंक्षतपदाचा गैरवापर करून जाणूनबुजून हेच केलं आहे. बावनकुळेंनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. सरपकार नवीन नवीन डाव शोधत आहे. मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात आहे. काही तरी खोटं बोलत आहे. नोंदीतील क्षुल्लक चुका दाखवल्या जात आहे. कुठे कुणबा लिहिलंय, कुठ पेनाने लिहिलंय, कुठं शाईने लिहिलंय, तर कुठे हस्ताक्षरात बदल आहे, असे बहाणे दिले जात आहेत. गावात आलेले तलाठी बदलले की नाही? दर वर्षी तलाठी बदलतो. अक्षर बदलतात. एकच तलाठी 50-50 वर्ष एकाच गावात राहतो का? बावनकुळे काही तर बहाणे करत आहेत. बावनकुळेंना काही अक्कल आहे का? मला कळत नाही, असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला.


सरकारने चुक झाली सांगून ती दूरुस्त करावी अन्यथा चवताळलेला मराठा मुुंबईकडे कूच करायला मागे पाहणार नाही, ती वेळ आमच्यावर आणू नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

Comments


bottom of page