राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

नवी दिल्ली: राष्ट्रवादी शरद पवारांच्या खासदारांनी आज सोमवार (दि.10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या 25 दिवसांतील पवारांच्या राष्ट्रवादीची ही चौथी भेट ठरली आहे. यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अमित शाहांची भेट घेतली. आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व आठ खासदारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. मात्र, राज्यातल्या काही महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासाठी आणि विकासकामासाठी भेट घेतल्याचा दावा खासदार आमोल कोल्हेंनपी केला आहे.
दुसरीकडे संजय राऊतनांनीही पवार इंडिया आघाडिविरोधात जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी मात्र भेटीचं समर्थन केलं आहे. डिलिमिट-शन घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मोदी सरकार कमालीचं अस्वस्थ आहे. आणि हे विधेयक कंजूर करून घेण्यासाठी केंद्राची गेल्या काही महिन्यांपासून जुळवाजुळव गुरू आहे. आणि त्यासाठीच प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याची रणनीती भाजपानं आखली आहे. आणि पवारांच्या मोदी शहांसोबतच्या भेटीगाठी त्याचाच भाग असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हे विधेयक आलंच तर पवारांची काय भूमिका असेल याबाबत सार्या देशात उत्सुकता लागली आहे.



Comments