महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपलेले आहे, जरांगे बिनडोक माणुस - लक्ष्मण हाके
- Navnath Yewale
- 14 hours ago
- 2 min read

सोलापूर: राज्यात ओबीसी आरक्षण संपलेले आहे, आरक्षण संपलं की नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे राज्यीरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातून ओबीसींची वज्रमुठ आवळण्याचा इशारा दिला आहे .
राज्य सरकारने कुणबी समाजाला लागू केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या दाखल्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. त्यात त्यांनी सोलापूर दौर्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. आता जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून जोरदार पलटवार केला जात आहे. लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातील आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पत्रकार परीषद घेतली. या पत्रकार परीषदेत त्यांनी आमदार प्रसादर लाड यांच्यासह जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
लक्ष्मण हाके म्हणाले, राज्यातील ओबीसी आरक्षण संपलेलं आहे, आरक्षण संपलं की नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे. राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवरी बदव आणण्याचा प्रयत्न करत आहे. महसूलमंत्र्यांना मी गिणीत नाही हे दखवतायत,ही दडपशाहीची भाषा आहे. ओबीसी नेते यांना सांगण आहे की, आरक्षण संपलय आणि तुम्ही बोलायला तयार नाही. शासनकर्ते जमातच ओबीसी म्हणून निवडून आलेत मग मूळ ओबीसी कुठं आहेत? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला.
जरांगेकडं मांडवली करायला जाणार्या प्रसाद लाड च्या क्रिस्टल कंपनीने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एक लाख नोकर्या पळवल्या. प्रसाद लाड नावाच --खोराच्या कंपनीलाच कसे कॉन्ट्रॅक मिळतात हा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. घर गणणनेत पालाचा रकाना आहे का? असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न उपस्थित केले.
जरांगे हा एक लूथ भरलेलं कुत्रा आहे, आगोदर छगनराव भुजबळांवर नंतर परळीतील मुंडे बंधू-भगिणींवर, मुख्यमंत्री महोदयावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि आता बावनकुळेंवर चावतय काय चाललंय महाराष्ट्रात. जरांगेंनी जी रॅली सुरू केली म्हणजे तुम्ही शासनावर दबाव टाकतायत अशी गंभीर टिकाही त्यांनी केली.
ओबीसी आरक्षणावर दुर्दैवाने नऊ मंत्रीही बोलत नाहीत. सामेर येऊन सांगा की हाके चुकीचं बोलतोय असं तरी सांगा एकदा. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ओबीसी आरक्षण राहिलं का? संपलयं, डुबलं कसं काय ते आम्हाला सांगावं असा सवालही त्यांनी केला.
ओबीसींच्या जागा ह्या मराठा कुणबी यांनी घेतल्या आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षण संपलेलं आहे. कुणबीचे 4 प्रमाणपत्र रद्द झाले आहेत तर जरांगे थयथय नाचतोय. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जाते, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महसूलमंत्र्यांच्या व्यंगावर बोलतायत. राज्यातील पुरोगामी कुठं गेलेत? हा वर्णभेद नाही का? असा सवालही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील हे बोलतायत, केवळ ओबीसींवर नाही, ओबीसी नेत्यांवरही बोलत आहे. महाराष्ट्रमध्ये अत्रे आणि ठकारेंची भाषा बघितली, पण जरांगे नावाच्या माणसाने असली भाषा आणली आहे. विखे पाटील, उदय सामंत किती वेळा तुम्ही त्याला भेटायला जणार? शिरसाठचे पावणे दोनशे कॉल होते असं म्हणतोय, याचा अर्थ बाकीच्यांना मतांचा एक अधिकार आणि त्याला जास्त आहे का? असे म्हणत हाकेंनी जरांगे पटलांवर टीका केली. शिक्षकांची नोकर भरती निघाली आहे. कटींग लिस्टमध्ये लोकांना 10 टक्के ही जागा मिळणार नाही, कुठला रोस्टर तुम्ही सांगताय? महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू आहे. आज ओबीसीचे आरक्षण संपलं आहे, दलित बांधवांनी आमच्यासोबत यावं, आज आम्ही जात्यात आहोत उद्या तुम्ही असणार आहात, असेही हाकेंनी म्हटले.



Comments