कुर्डू प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !
- Navnath Yewale
- Sep 13
- 1 min read

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील मुरूम प्रकरणात अजितदादांच्या अडणचणी वाढताना दिसत आहेत. कुडर्र्ू मुरूम उत्खनन प्रकरणाचा अहवाला माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकार्यांकडे पाठवला आहे. अहवालातील नमूद गोष्टींमुळे अजितदादांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आयपीएस अधिाकरी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. तर त्यांच्या बचवासाठी विरोधी बाकावरील आमदार रोहित पवार समोर आल्याचे दिसून आले होते. आता या अहवालाने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.
कुर्डुतील मुरूम उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचा ठपका माढाच्या तहसीलदाराने पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. कुर्डु येथील गट क्रमांक 575-1 मध्ये 120 ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकार्यांना हा अहवाल पाठवला आहे. दादाराव माने यांच्या शेतातून हा मुरूम उत्खनन करण्यात आला होता. उत्खनन केलेला मुरूम हा शिराळ कुर्डू अंबड येथील पाणंद रस्त्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्रकरणात 2024 साली आदेश देण्यात आले होते. पण त्याला मुदतवाढ देण्यात आली नव्हती. मुरूम उत्खनन गटातून बेकायदेशीररित्या हा मुरूम उत्खनन केल्याचे गटविकास अधिाकर्यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.
कुर्डू मुरूम उत्खनन प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुर्डूमध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे.
त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतीही पनवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आहे. ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. समन्वयाने पुढे गेले पाहिजे. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत, असं मंत्री गोरे म्हणाले. दरम्यान, आज गावकर्यांनी बंद पुकारण्याचा निर्णय जाहिर केला होता.



Comments