खासदार ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सहभागी होण्याची घोषणा: मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या हितासाठी शिंदेच्या नेतृत्वात काम करणार
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 2 min read

धाराशिव: महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क- वितर्कांना पूर्णविराम देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश उर्फ ओमराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी आज अधिकृतपणे जाहीर केले. या निर्णयामुळे ठकारे गटाला मराठवाड्यात अत्यंत मोठा धक्का बसला आहे.
गोवर्धनवाडीतील बैठकीनंतर घोषणा: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज धाराधिवमधील आपल्या गोवर्धनवाउी या निवास्थानी सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची तातडीची बैठक बोलावली होती. जवळपास 4 ते 5 तास चालेल्या या मॅरेथॉन बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची मते आणि भावना जाणून घेतल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि कार्यकर्त्यांचे भविष्य यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी सत्तेसोबत जाण्याचा म्हणजेच शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ओमराजे म्हणाले की, विरोधी बाकावर असल्याने गेल्या दोन वर्षांत मतदारसंघातील जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोठी कामे आली नाहीत. स्थानिक निवडणुकांमध्येही याचा फटका बसला. विकासकामांसाठी सत्तेत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
एकनाथ शिंदेचे कौतुक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत ओमराजे म्हणसले की, “ संकट काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले” अशा शब्दांत त्यांनी शिदे, फडणवीस यांनी स्तुती केली. त्याचबरोबर वडिलांच्या हत्या प्रकरणातील न्यायालयीन लढाईत मिरिटवर न्याय मिळवण्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर विनंती केल्याचे अवर्जुन नमूद केले.
उद्धव ठाकरेंबद्दल वाईट बोलणार नाही: निर्णयाची घोषणा करताना ओमराजे काहीसे भावनिक झाले होते. ते म्हणाले “ उद्धव ठाकरे साहेबांनी मला नेहमीच प्रचंड स्नेह आणि प्रेम दिले आहे. त्यामुळे मातोश्री किंवा ठाकरे कुटुंबाबद्दल माझ्या मुखातून कधीही एकही वाईट शब्द निघणार नाही. हा निर्णय मी केवळ माझ्या मतदार संघातील लोक आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेत आहे” असंही ओमराजे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ऑपरेशन टायगर यशस्वी: राज्यात चर्चिल्या जात असलेल्या ‘ ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यानंतर आता ओमराजे निंबाळकर यांनीही शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचे निश्चित केल्याने महायुतीच्या नेत्यांनी“ ऑपरेशन टायगर यशस्वी ” झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



Comments