ठकारेंचे बंडखोर खासदार उद्या शिंदेच्या मंचावर नाहीत, सहा पैकी चार खासदार राजस्थानमध्येच!
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

मुंबई : शिंदेचे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी बंडखोर सहा खासदारांच्या संबंधी एक मोठी माहिती समोर येत आहे. हे सर्व खासदार 19 जून रोजी होणार्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेच्या मंचावर दिसतील अशी चर्चा सुरू होती. मात्र या खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता बदलण्यात आल्याची माहिती आहे. 21 किंवा 22 जून रोजी हे सर्व खासदार महाराष्ट्रात परत येणार असून त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदेंची साथ देण्याचं निश्चित केलं आहे. या सहा खासदारांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं आहे. त्या संबंधी अद्याप कोणताही पुरवा किवां फोटो समोर आला नसला तरी येत्या एक दोन दिवसात संसदेत त्याची घोषणा केली. जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर खासदारांचा हा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.
येत्या 19 जून रोजी गोरेगावच्या नेक्सो सेंटरमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता मात्र त्यामध्ये बदल झाला आहे. 19 जून रेाजीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये, शिंदेच्या व्यासपीठावर हे खासदार दिसणार नाहीत. त्यामुळे या खासदारांविना हा कार्यक्रम पार पडणार आहे.
बंडखोरी केलेल्या या खासदारांचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरमध्ये सहापैकी चार खासदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर देान खासदारप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या सर्व खासदारांना 21 जून किंवा 22 जून रोजी महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. तोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा झालेली असेल. त्यामुळे त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.
बंडखोर खासदार :
संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ -वाशिम), नागेश पाटील आष्टीकर(हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशीव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
उद्धव ठाकरेंसोबतचे खासदार : अरविंद सावंत (दक्षिण मुंबइ), अनिल देसाई (दक्षिण मध्य), राजाभाऊ वाजे (नाशिक)



Comments