खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
- Navnath Yewale
- 6d
- 1 min read
शनिवारवाडा सर्वधर्मीयांचा; कुलकर्णीवर गुन्हा दाखल करा रुपाली ठोंबरे यांची मागणी

पुण्यात शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवार वाड्यात गोमुत्र शिंपून शुद्धीकरण केले. शनिवारवाडा ही हिंदूंचा ऐतिहासिक सांस्कृतीत ठेव असून यापूढे असे कृत्य सहन केले जाणार नाही, शिवाय शनिवार वाडा परिसरातील दर्गावर भगवा फडकवण्याचा इशराही त्यांनी दिला होता.
खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या अॅड. रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी या कायम हिंदू -मुस्लिमचा मुद्दा उपस्थित करून पुण्याचे सामाजीक स्वास्थ बिगडवण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराचे हिंदू आहोत. मेधा कुलकर्णीचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.
पुण्यात हिूंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदत आहेत. हिंदू मुस्लिम करून मेधा कुलकर्णींना इथला सामाजीक एकोपा घालवायचा आणि दंगली घडवून आणायच्या आहेत. पण आम्ही त्यांचा हा डाव उधळून लावू असा आरोप आणि इशरा देत आज शनिवारवाडा परिसरात अॅड. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी अटक करा, अटक करा मेधा कुलकर्णींना अटक करा, जय भवानी जय शिवाजीची घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. दिवाळी सनामुळे वाढत्या गर्दीचे गांभीर्य राखून पुणे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून आंदोलकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले.
रुपाली पाटील यांना भुवळ
आंदोलन सुरू असताना पक्षाच्या अॅड. रुपाली ठोंबरे पाटील यांना अचनाक भुवळ आली. आंदोलनकर्त्यांनी तत्काळ अॅड. ठोंबरे यांना उपचारार्थ रुग्णलयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनस्थळी डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.



Comments