खासदार मोहिते पाटलांच्या धमकी प्रकरणाला वेगळे वळण; दार लावून अधिकार्यास मारहाणीचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दावा
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

सोलापूर: खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्यास शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकार्याला मारहाण झाल्याचा दावा केल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अधिकारी धमकी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दार लावून त्या अधिकार्याला मारहाण झाली आहे, असाही दावा केला आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिर तालुक्यातील अधिकार्याला मोहिते पाटील यांच्याकडून दिलेल्या धमकी प्रकरणावर प्रश्न विचारण्यावत आला होता. त्या वेळी त्यांनी संबंधित अधिकार्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
पालकमंत्री गोरे म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील धमकीचा विषय फार गंभीर आहे. पंचायत समितीच्या त्या अधिकार्याला मारहाण झाली आहे, दार लावून त्या अधिकार्याला मारहाण झाली आहे. अधिकार्याला धमकी दिल्याची क्लिप सर्वांनी ऐकली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यात जे कोणी देाषी आहेत, त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील. पण सोलापूर जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात अधिकार्यांवर हुकूमशाही, धमकी चालणार नाही, असाही मंत्री गोरे यांनी इशारा दिला आहे.
पुढे बोलताना गोरे म्हणाले अधिकार्यांनी कामे केलीच पाहिजे, त्यांना कामापासून पळ काढता येणार नाही, पण काम करत असताना अधिकार्यांवर दडपशाही गुंडगिरी करून कोणी काम करायचा प्रयत्न करत असेल, तर कुठलीही गुंडगिरी या जिल्ह्यात चालू देणार नाही. सोलापूचे शेतकरी कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहेत. शेतकर्यांचे प्रश्न सोडवणे आची जबाबदारी आहे. सीमावर्ती भागातील शेतकर्यांना आम्ही मदत करत आहोत, सध्या अल निनोचे संकट आहे, त्यामुळे शेतकर्यांनी समजून घेतले पाहिजे. त्या शेतकर्यांना विनंती आहे की, प्रत्येकवेळी अशी भूमिका घेऊ नये, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.



Comments