top of page

मातोश्रीवर काळ्याजादूसाठी बंगालचा जादूगार, विनाकय राऊत मास्टमाईंड- मंत्री शिरसाट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्याच सुनेने गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा अरोप सून गिरीजा राऊत यांनी केला आहे.


या बाबत गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर त्यांच्या तक्रारीवरून विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे.


माजी खासदार विनायक राऊत प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उबाठा गटाच्या प्रत्येक जणाला अशी बोभाटा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो आणि विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.


मंत्री शिरसाट यांच्या दाव्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. शिवाय राऊत यांनी स्वत:च्या सुनेचे केस कापणे हे अत्यंत भयानक आहे. स्वत: जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वत: जादूगाराला सोबत ठेवतात, दुटप्पी लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. सुनेने गुन्हा दाखल केला त्याप्रमाणे सरकारने समोटो अंतर्गत कारवाईचे आदेश द्यायला पाहिजेत, अशी मागणी करत शिरसाट यांनी राऊतांना टार्गेट करत ठाकरेंना घेण्याची टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे.


दरम्यान, सूनेनं आपल्यावर आणि कुटुबियांवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. गितेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर मागील 3 वर्षापासून त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. तक्रारीत 2018-22 पर्यंत अघोरी कृत्य केली जात होती, असं लिहिलं आहे. या काळात तिचे आई-वडील तिच्याबरोबर होते. मग त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही? असा सवाल करत 2022 मध्ये झालेल्या अन्यायाची तक्रार 2026 साली करतायत यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय सून गिरीजा हीने आपल्याकडे तडजोड करताना 3 बीएचके व टेरेस फ्लॅटसह 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

Comments


bottom of page