top of page

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुक वातावरण तापलं ! मतदानासाठी भाजप नेत्यानं भावलाच पळवलं; पारनेर पोलिसात गुन्हा दाखल

Jul 10
2 min read

आहिल्यानगर : आहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सध्या जिल्ह्यात सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांमधून मतदनासाठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान, पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे यांनी त्यांच्या भावाला मतदानासाठी पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, सुभाष दुधाडे हे लोणी हवेली येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करतात. तसेच ते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहे. गावाील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ठरावासाठी 13 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, त्यासाठी संचालक मंडळ मतदान करणार आहे. या मतदानात त्यांचे भाऊ शिवाजी चांगदेव दुधाडे हे मतदार आहेत.


दुधाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 जूलै रोजी सायंकाळी 7:00 वाजल्यापासून त्यांचे भाऊ शिवाजी दुधाडे हे बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याचे अढळून आले. दरम्यान, रात्री 9:51 वाजता गावातील अमोल विक्रम दुधाडे, जो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा कार्यकर्ता आणि विद्यमान उपसरपंच याने संभाजी दुधाडे यांना फोन करून शिवाजी अप्पांना कोणत्या गोळ्या चालू आहेत, ते सांगा. ते माझ्यासोबत आहेत, असे सांगितल्याचा अरोप करण्यात आला आहे.


यानंतर सुभाष दुधाडे आणि इतर नातेवाईकांनी शिवाजी दुधाडे यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तसेच अमोल दुधाडे यांचाही मोबाईल बंद अढळून आल्याचे पालिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान शिवाजी दुधाडे हे घरी परतले नसून, सोसायटीच्या ठराव बैठकीत त्यांनी त्यांच्या पसंतीच्या गटाला मतदान करू नये, या उद्देशाने अमोल दुधाडे यांनी त्यांना पळावून नेऊन कुठेतरी लपून ठवेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.


याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलिस करत आहेत. तसेच जिल्हा बँकेच्या ठरावावरून यापूर्वी पाडळी रांजणगाव येथील संचालकांना पळवून नेल्याचा गुन्हा सुपे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ठराव आपल्याच बाजूने व्हावा यासाठी अनेेक गावांमध्ये संचालकांना दमबाजी केली जात असल्याचे चर्चा सुरू आहे.

Comments


bottom of page