जिंतूरमध्ये बंजारा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; वाहनांची तोडफोड , रास्ता रोकोने शहरात खळबळ

परभणी: बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जिंतूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (दि.21) अचानक हिंसक वळण लागले.. मागील अनेक दिवसांपासून उपोषण करणारे आंदोलक विनोद आडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला, यावेळी आयशर ट्रक, ऑटो आणि स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी विनोद आडे हे गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत.शासनाने मागणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. सोमवारी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येनपे समाजबांधव गोळा झाले असता विनोद आडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळातच आंदोलकांनी रस्त्यावर उतरून अचानक रास्ता रोको सुरू केला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनातीत असतानाही आंदोलकांनी वाहतूक रोखल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली.
संतप्त आंदेालकांकउून रस्त्यावर असलेल्या आयशर ट्रक, ऑटो तसेच एका स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक, नागरिक आणि परिसरातील व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती शहरात पसरताच व्यापार्योंध्येही मोठी घबराहट निर्माण झाली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी अनेक व्यापार्यांनी आपापली दुकाने घाईघाईने बंद केली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत शुकशुकाट पसरला. आंदोलानाच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला असतानाही अचानक रास्ता रोको आणि वाहनांची तोडफोड झाल्याने कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बंजारा समाजाच्या एसटी आसरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने भूमिकरा स्पष्ट करावी. अशी मागणी होत असतानाच सार्वजनिक रस्ते अडविणे आणि वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.



Comments