top of page

गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवार!

नाना पेठेत तीन गोळ्या झाडून गोविंद कोमकरची हत्या



पुणे: वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होण्याआगोदरच त्याच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. ऐन गणेशोत्वात नाना पेठेत खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनराज आंदेकरचा मेहुणा गणेश कोमकरचा मुलगा गोविंदची हत्या करण्यात आली आहे. विसर्जनाला अवघे काही तास उरलेले असताना ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक वनराज आंदेकरची त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्घुण हत्या करण्यात आली होती. भावा-बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातूून ही हत्या झाली होती.


या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणी संजीवणी आणि कल्याणी आणि दोन सख्ये मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांना अटक केली होती.

पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास तब्बल पाच दशकांचा आहे. त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.


वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा “ गेम” उडणार अशी हवा गुन्हेगारी वर्तुळात तयार झाली आहेत. अखेर वर्ष पूर्ण झाल्यानंतर हत्या झाली आहे. वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाडासह जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. ते तुरुंगात असले, तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.


नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण

विसर्जन मिरवणुकीसाठी अवघे काही तास उरलेल असताना काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रज्ञांनी हल्ला केला. हा प्रकार घडल्याने नागरकिांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments


bottom of page