top of page

गुप्त एसआयटी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी स्थापन केली का? - जरांगे पाटील

पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्या विकास कामावर धंनजय मुंडे सोबत बंद दराआड चर्चा करतात!

ree

केज: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेवून संतोष देशमुख यांना अभिवादन केले. वर्ष उलटूनही हे सरकार संतोष भैय्या देशमुख यांना न्याय देऊ शकलं नाही. संतोष भैय्याच्या हत्येचा मुख्यआरोपी वाल्मिक कराड जेलमधून बाहेर येणार असल्याचे बोलले जात आहे. तसं झालच तर राज्यात एकही चाक फिरु देणार नाही. मुळात वाल्मिक कराड जेलच्या बाहेर येणारच नाही तो तसाच जेलमध्ये मरणार असल्याचा पलटवार करत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.


संतोष देशमुख यांच्या हत्तेला आज वर्ष पूर्ण झाले त्यानिमीत्ताने जरांगे पाटील यांनी आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेवून माध्यमांशी संवाद साधला.


संतोष भैय्या देशमुख यांना मिळवून देण्यासाठी सरकार उदाशिन आसल्याचा आरोप करत धनंजय मुंडेनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंददाराआड चर्चा केल्याची माहिती आहे. चौघांच्या बैठकीत विकास कामावर चर्चा झाल्याचे सांगितले जात असतले तरी सरकारला वाल्मिक कराड बाहेर काढून धनंजय मुंडेना गिप्ट द्यायच्या हालचाली सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत विकास कामासाठी पोलिस महासंचालक बैठकीला लागतात हे मी आज पहिल्यांदाच ऐकतोय, धनंजय मुंडे सरकारचा बाप झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्याला मोजत नाहीत पण निश्चित त्या दोघांचं काहीतरी धनंजय मुंडेकड असलं पाहिजे त्याशिवाय हे घडत नाही असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.


पुढे बोलातना जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या घातापाताचा कट धनंजय मुंडेनीच रचल्याचं तीनही आरोपींनी कबुल केलं आहे. काल मिडियासामोर धनंजय मुंडे म्हणाला की या प्रकरणावर एसआयटी स्थापन केली, मला एसआटीच स्थापन झाल्याच माहितीच नाही. गुप्त एसआयटी आणि गुप्त अहवाल सरकारने धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठीच स्थापन केली असावी.

माझ्या घातापाताचा विषय आणि एसआयटी स्थापन झालेली मलाच माहिती नाही, हे अश्चर्यच म्हणावं लागेल. गुप्त एसआयटी कधी स्थापन केली. कोणासाठी स्थापन केली असा सवालही जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

Comments


bottom of page