गेवराईत वर्दळीच्या रस्त्यावरून भरदिवसा तरुणीचे अपहरण अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद, पोलिसांकडून कारचा पाठलाग
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 1 min read

बीड: बीडच्या गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुवारी दुपारी कॉलेजमधून घरी परतणार्या एका अल्पवयीन मुलीचे दान तरुणांनी अपहरण केले आहे. ही घटना दुपारी 12:00 च्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या रस्त्यावर घडली. मुलगी कॉलेजमधून पायी घरी परतत असताना दोन तरुणांनी तिला अडवले.
आरोपींनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला जबरदस्तीने एका कारमध्ये ढकलून, जालना जिल्ह्यातील शहागड (ता.अंबड) दिशेने पळून गेले. मुलीला गाडीत ढकलले जात असल्याचे पाहून आजूबाजूचे लोक हादरले आणि त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अपहरणाचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रमुख मार्गावर तात्काळ नकाबंदी सुरू केली आहे. शिवाय आरोपींच्या शोधासाठी पोसिलांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा कयास लावला जात आहे. मात्र, भरदिवसा गेवराई शहरातून गजबजलेल्या वर्दीळीच्या मुख्य रस्त्यावरुन एका युवतीचे अपहरण हे महिला सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणारे असल्याने पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांनी प्रकरणात लक्ष घातले आहे. नवनित कॉवत म्हणाले की, आरोपींना लवकरच अटक केली जाईल.



Comments