top of page

गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत...- रोहित पवारांकडून डीजीसीएच्या अहवालावर नाराजी,

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चार दिवसांपूर्वी डीजीसीएकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी सुरूवातीपासून संशय आणि धक्कादायक दावे करून प्रकरण लावून धरलेल्या रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत अहवालाबाबत अक्षेप, नाराजी व्यक्त केली, शिवाय सादरीकरणातून धक्कादायक दावे केले. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या, यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं रोहित पवार यावेळी म्हणाले.


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न आमदार रेाहित पवार यांनी उपस्थित केले होते. याआधी त्यांनी मुंबईसह दिल्लीत देखील पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले आहेत. अशातच दोन दिवसापूर्वी आलेल्या डीजीसीए च्या अहवालाबाबत आज काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहिती पवार म्हणाले की, मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए आणि एरो या कंपन्याना मी टार्गेट करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत आहे, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्व नियोजीत दौरा नव्हता आपणद म्हटला होतं तेही मान्य करण्यात आले आहे. ऑफिशियल ऐजच्या 3000 तास जास्ते विमान चालले होते. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये, पण त्या झाल्या. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एएआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणधत रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर...

त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवत, अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलं की, व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बॅक झालं नव्हतं, तर लेप्टला पडलं होतं. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर अपाण विचारायला गेलं, तर डोक्यात लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे (अहवालात) सांगण्यात आलंय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण एआयबी या संस्थेचं चुकलंय असं आमचं मत आहे. त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडची आणि विमानाची उंची कुठं मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायवा म्हणून दिला की झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागले, असेही रोहित पवार म्हणाले.

एएआयबी च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमचं नाव देखील नाही .


झाडाला धडकून विमान खाली पडलं असं रिपोर्टमध्ये लिहिल आहे, मुळात झुडुपाला देखील विमान धडकलं नाही, एएआयबी च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमचं नाव देखील नाही. यापूवीृ 2023 च्या मुंबई विमान अपघात प्रकरणात तपास अधिकार्‍यांच नाव होतं. व्हिजिबलिटी कमी होती. आमचं म्हणणं आहे की, अ‍ॅरो मनोज पवार याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्याने व्हिजिबिलिटी ठीक असल्याची माहिती दिली होती. डीजीसीए ने व्हीआयपी प्रवासासाठी त्यागी समिती नेमून अत्यंत कडक नियम बनवले होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, व्हिजिबिलीटी नसेल तर विमान उड्डाण करायचं नाही. तरीदेखील विमानाने उड्डाण केलं कसं? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.

Comments


bottom of page