top of page

ग्रामरोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात; घरकुलाच्या मस्टरसाठी मागितली तीन हजाराची लाच

बीड: जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच आज शुक्रवारी(दि.7) एका ग्रामरोजगार सेवकाला लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .


पीएम आवास योजने अंतर्गत घरकुलाचे मस्टर काढून देण्यासाठी एका मस्टरमागे 100 रुपये या प्रमाणे 30 मस्टरसाठी एकूण 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामरोजगार सेवक गोविंद सोपान गोरे (वय 50,रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) याला एसीबीच्या पथकाने बनेश्वर मंदिराजवळ रंगेहाथ पकडले. गोरे हा बनसारोळा ग्रामपंचायतीचा ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदारकडून लाचेची मागणी केल्यानंतर पडताळणी करण्यात प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समधान कवडे, पोलीस अंमलदार मूच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचंगुंडे, अविनाश गवळी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments


bottom of page