छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर
- Navnath Yewale
- Dec 29, 2025
- 1 min read

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) 18 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि.28) जाहीर केली. पुढील दोन दिवसांत आणखी दोन याद्या जाहीर होतील, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली.
सत्तेत एकत्र व महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना व भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. देशमुख म्हणाले की, पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी देण्यात आली. आता सोमवारी यादी आणि तिसरी यादी मंगळवारी जाहिर करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) च्या 18 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 6 महिलांचा समावेश आहे. त्यातील दोन माजी नगरसेवक आहेत.



Comments