छगन भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी, त्यांना जेलमध्ये टाका- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Sep 10
- 2 min read

जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र टीका केली आहे. कुणबी प्रवर्गातील समाविष्टीच्या निर्णयावर भुजबळांनी विरोध दर्शविल्याने जरांगे पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी भुजबळांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळ—े सरकार आणि मराठा समाजाचा रोष वाढू शकतो, असे जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी भुजबळांना सकरापेक्षा मोठे मानण्यास नकार दिला आहे.
छगन भुजबळ हे सरकारसाइी धोक्याची घंटा आहेत, त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आझज्ञद मैदानात आंदोलन करणार्या मनेाज जरांगे पाटील यांच्या मागण्यांपैका काही मागण्या सरकारने गेल्या आठवड्यात मान्य केल्या. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून ओबीसी मात्र नाराज झाले असून महायुतीमधील मंत्री असलेले छगन भुजबळ यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी, अशी मागणी करत यासंदर्भात याचिका दाखल करणार असल्याचे काल भुजबळ म्हणाले होते.
मात्र भुजबळांच्या खोड घालण्याच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत. त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठ कमी होत आहे. भुजबळांमुळे तो वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसांना भुजबळांमुळ—े डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्यांना जेलमध्ये जाऊ दिलेलं बर, कारण त्यांना तुम्हीच (सरकारने) बाहेर आणलं, आणि आता तुम्हालाच ते परत घातक बनणार असतील तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका, तेच बरं, नाहीतर फडणवीस साहेबाच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो असं जरांगे म्हणाले.
भुजबळ सरकारची डोकेदुखी
भुजबळ यांना इतका प्रसिद्धिची, नावाची आणि चलतीचा माज आणि मस्ती आहे. सरकारचं नाही माझं ऐकायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तू काय बाप लागून गेला का सगळ्यांचा, तुलाच खूप अक्कल आहे, सरकारला अक्कल नाही का? असा प्रश्न विचारत जरांगेंनी भुजबळांवर निशाना साधला. हे बिनडोक आहेत, सरकारने त्याला सोडवून आणलं. आणि आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.



Comments