top of page

छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये जोरदार चकमक; कोपरशी गावात सर्च ऑपरेशन सुरू

ree

राज्यभरात गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोपरशी परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-60 चे जवान आणि नक्षलवाद्यांचे जोरदार चकमक सुरू आहे. आज (27 ऑगस्ट) पहाटेपासून ही चकमक सुरू असून परिसरात जोरदार पाऊसही सुरू आहे. त्यामुळे सी-60 च्या जवानांसमोरील आव्हान वाढले आहे. मात्र विपरीत परिस्थितीतही गडचिरोली पोलिस नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सी-60 पथकाकडून हे अभियान राबवण्यात आले होते. काही तासानंतर या चकमकीतून पोलिसांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. सध्या गडचिरोली पोलिस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून अद्याप या कारवाई संदर्भातील तपशील पुढे आला नसला तरी दंडकारण्यात नक्षली सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Comments


bottom of page