छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील 7 वरिष्ठ अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील सात वरिष्ठ अधिकार्यांची जिल्ह्याबाहेर तडकाफडकी बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बदली झालेल्या अधिकार्यांच्या जागी बाहेरच्या जिल्ह्यातील पाच अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य पोलिस दलातील पोलिस निरिक्षकांच्या सार्वत्रिक आणि विनंती बदल्यांची यादी गृह विभाग आणि पोलिस महसयंखसलक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरिक्षक सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने हे बदली आदेश निघाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलिस दलात 5 नवीन अधिकारी जालना, बीड, जळगाव, मुंबई या शेजारच्या जिल्ह्यातून रुजू झाले आहेत. यात शेषराव खटाणे पीटीएस जालना, अशोक मुदिराज बीड, सचिन सानप जळगाव तर साईनाथ गिते, मुंबई शहर येथून आले आहेत. राजू तडवी हे अधिकारी जालन्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातून रुजू झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील मंगेश जगताप यांची पुणे शहर पोलिस येथे बदली करण्यात आली आहे. तर कुंदन जाधव यांची अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्समध्ये, श्रीनिवास रोयेलावार यांची परभणीमध्ये, सोमनाथजाधव यांची पिंपरी- चिंचवडमध्ये, राजेश मयेकर यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे.
तसेच रविकिरण दरवडे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक आणि सुधीर धायरकर यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यात गेन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बदल्यामधून ती कमी करता येते का? त्यासाठी काय उपाय नवे अधिकारी येजतात? याकडे सगळ्यांकडे लक्ष असणार आहे.