top of page

हल्लाबोल होताच एकनाथ शिंदे, उद्य सामंतांचा मनोज जरांगेंना फोन शिरसाटांचे 175 मिस्ड कॉल

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना झोप नाहीय, आता त्यांचा फोन आला होता. आमची झालेली चूक सुधारतो म्हणालेत. तुम्ही तुमची झालेली चूक सुधारुन घ्या; अन्यथा आम्ही मराठे गप्प बसणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. शिंदे साहेबांचा फोन मी घेत नाही, त्यांच्या ओएसडीचा फोन आला होता. संजय शिरसाठांचे पावणे दोनशे मिस्ड कॉल आहेत, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.


मनोज जरांगे पाटील यांनपी लक्ष्मण हाके यांच्या बाळासाहेब भवनमधील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यात त्यांनी निवडणुकीत कशी मदत केली होती. उद्धव ठाकरे बरे असे म्हणण्याची वेळ आमच्यावरआणू नये, असा हल्ला चढवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केले होते.


त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या फोनबाबत माहिती दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यसांनी तब्बल पावणे दोनशे मिस्ड कॉल केल्याचेही जरांगें पाटील यांनी स्पष्ट केलं.


दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड आणि उद्योग मंत्री उद्य सामंत यांनीही फोन केल्याचे सांगितले.स्वत्र: लाड यांनीही तीन ते चार वेळा मनोज जरांगे पाटील यांना फोन केल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांचा गैरसमज निश्चितपणे दूर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.


जरांगे पाटील म्हणाले, भाजपला सत्तेचा माज आलाय. त्यांच्या डोक्यात एकच गेलंय , आपलं कोण काय करतं. आपण बहुमताने आलोय. ते मुस्लिमांच्या मागे लागले, त्यांना वाटलं आमचं कोण काय करत नाही. धनगरांच्या मागे लागले त्यांना 15 वषेृ फसवलं, आता दलित बंजारा समाजाला फसवलं, शेतकर्‍यांनाही फसवलं. त्यांच्या डोक्यात आहे, आमचं कोणी काही करत नाही. मात्र आता त्यांना दाखवतो. त्यांना पळता भूई थोडी करतो.


आमदार प्रसाद लाड,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकटं मरमर करून काय करतील. एकटंच तडफडतंय काय करणार? अडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणा? मराठा, धनगृर, शेतकरी सर्वांसाठी फडणवीसांची विहीरीच कोरडी पडली आहे. आता मला त्यांच्या डोक्यातली कुट्टी काढायची आहे. एकही प्रमाणपत्र रद्द होऊ देणार नाही. मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले जरांगे पाटील आज सोलापूर येथील उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

bottom of page