जमिन घोटाळ्याचे आरोप: अजित दादा तातडीने वर्षावर, मुख्यमंत्री फडणवीस, अजित दादामध्ये चर्चा?
- Navnath Yewale
- Nov 7
- 2 min read

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटींचे बाजाभाव असणारी जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची 152 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ 500 रुपये मुद्रांक भरण्यात आले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे, तर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत, या घडामोडीदरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.
अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी प्रतिक्रिया याआधी अजित पवारांनी दिली होती. मात्र, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये पार्थ पवार प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस व अजित दादा यांच्यात कसलीही चर्चा नाही! : अजित पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासोबत महिला क्रिकेट टीम अभिनंदन करून लगेच गेले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पार्थ पवार प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही अशी माहिती विश्वासनीय सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. एकीकडे पार्थ पवारांच्या संबंधीत कंपनीवरती मोठे आरेाप होत असतानाच फडणवीस आणि पवार यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं, या भेटीमध्ये त्यांच्यात काय चर्चा होते का याकडे लक्ष लागलं होतं, मात्र यावेळी कसलीही चर्चा झाली नाही.
आठ जणांवर गुन्हे दाखल: पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराप्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, सुर्यूकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह आठ जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव समोर: अमेडिया कंपनीकडून खासगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती, त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना देण्याचा 22 एप्रिल 2025 ला प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची प्रत आता समोर आली आहे. या प्रस्तावानंतर 20 मे 2025 ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रत ही सोबत जोडण्यात आलेली आहे.
नेमकं प्रकरण काय? : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधीत आणखी एक मोठा जमीन व्यवहार वादाच्या भोवर्यात सापडला आहे. पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकण्यात आली, असा आरोप आहे. या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचं उघड होत असून, केवळ 500 रुपयांच्या स्टँप ड्युटीवर व्यवहार नोंदवला गेल्याचेही प्राथमिक तपासात दिसून आले आहे. विरोधाकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत रान उठवले आहे.



Comments