top of page

जरांगे पाटलांचा पुन्हा एलगार, मराठ्यांना वेढ्यात काढलंय; आता एकत मी राहीन, किंवा सरकार राहील जरांगे पाटील

Jul 29
2 min read

जालना: सरकार आश्वसनांची पुर्तता करत नसल्याने राज्यात मराठा आरक्षणा पेच वाढत चालल्याचा आरोप करत आता अंतिम लढ्याची साद घालत मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 29 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये बुधवारी (दि29) राज्यातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. उपस्थितांना संबोधीत करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता पुन्हा एकदा आंदोलन पेटण्याची चिन्ह आहेत, मराठा आरक्षण आणि प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक आंदोलनाची घोशणा केली आहे. आता एक तर मी तरी राहिन, किंवा सरकार तरी राहील, असा थेट निर्वाणीचा इशारा देत मागण्यांची अंबलजवाणी करण्याची मागणी केली आहे.


जालनातील आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.29) मराठा आरक्षण आंदोलकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली. येत्या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी देखील मराठ्यांच्या लेकरांवरील केसेस मागे घेतल्या नाहीत. सरकारकडून मराठा समाजाला वेड्यात काढायचं काम चाललंय.. आपण बारीक लक्ष द्यायला पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी केले.


आता, आपल्याला 29 ऑगस्ट शेवटचं खूप मोठं आंदोलन निर्णायक आंदोलन करायचं आहे. हे आंदोलन असं करायचं आहे की, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे राहता कामा नये. आता, या आंदेालनात मी तरी राहिल नाही तर सरकार तरी राहील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा खवळला तर माझ्याच काय तुमच्याही बापाला ऐकणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा नोंदीसाठी पुणे गॅझिटर, सातारा गॅझिटर आद्याप लागू का केलं नाही, असा सवालही जरांगे यांनी केला.


मराठ्याच्या मुलांना सरकारकडून सोयीसुविधा अजूनही दिल्या जात नसल्याचा आरोप यांनी केला. आता आपला लढा हा मराठा समाजासाठी आहे. कोणत्याही मराठा समाजातील मंत्र्यांनं आता सरकारच्या बाजूने नाहीतर समाजाच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली असल्याचे जरांगे म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्याच्या मराठा समाजातील मुलाचाही प्रश्न असून आता याला समाजाच्या दृष्टीने पाहायला हवे असे आवाहन जरांगे पाटील केले.


दरम्यान आजच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारकडे नऊ मागण्या मांडल्या आहेत. त्यानुसार

राज्यात मराठा समाजाच्या सापडलेल्या 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत, हैदराबाद गॅजेटिअरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र द्यावे, सातारा, कोल्हापूर, पुणे औंध आणि बॉम्बे या पाचही संस्थानच्या गॅजेटिअरची अमंलबजावणी जीआरसहीत पाहिजे, मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, ओबीसीच्या सर्व सोई- सुविधा मराठा समाजाला लागू कराव्यात, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत, सारथी योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं, एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस मधून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात या नऊ मागण्यां मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Comments


bottom of page