जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश; सरकारने शब्द पाळला मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा
- Navnath Yewale
- Jun 1
- 2 min read

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लढा देणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांसाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये वारसांना नोकरी मिळणार आहे. याबाबत मराठा आरणि आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
मराठा आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी मागील आवड्यात शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनीएक दिवसीय उपोषण केलं होतं, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणलढ्यात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांसाठी शासकीय नोकरीची मागणी केली होती. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषण सोडतांना अश्वासनही दिलं होतं. आता मराठा समाजासाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये देखील वारसांना नोकरी मिळणार आहे. मराठा अरक्षणलढ्यात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहेश. मराठा आरक्षण आंदेालनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना अश्वासन दिलं होतं. त्यानंतर आतासामान्या प्रशासन विभागाकडून सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसंना एमआयडीसी मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांनी मृत व्यक्तीच्या वारसांची अचूक, अद्ययावत आणि योग्य राहणीशी संबंधित तपासणी करून तातडीने प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा आरक्षण लढ्यातील मृत आंदेालकांच्य कुटुंबियांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारची महत्वाची कार्यवाही मानलरी जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने देखील मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका अवलंबितास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच धोरणात्मक निर्णय त्यांच्या 410 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
या धोरणानुसार, मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची योग्य शहानिशा करून संबंधित जिल्हाधिकार्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. जेणेकरून पात्र वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणे सुलभ होईल. त्या अणुषंगाने मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आरपणास सूचित करण्यात येत आहे की, आपल्याजिल्हा कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांची (मृत व्यक्तींच्या वारसांची) अचूक, गतिमान आणि योग्य शहानिशा करावी. तपासणीअंती पात्र वारसांबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र आपल्या स्तरावर तातडीने निर्गमित करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे आदेशीत करण्यात आले आहे.



Comments