जरांगे पाटलांच्या आरोपांवर ओबीसी नेत्यांचा जोरदार पलटवार शिवसेना भवन काय तुझ्या बापाचं घर आहे काय? - लक्ष्मण हाके

पुणे : कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीतून पत्रकार परीषदेद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत सरकावर हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून जरांगे पाटील यांच्या अरोपावंर जोरदार पलटवार केला.
मराठा आरक्षण आंदोलक मनेाज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून सरकारसह एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ डबल गेम’ चा आरोप करत बावनकुळे, संजय शिरसाट यांच्यावर घणाघात केला. जरांगे पाटील यांच्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकार परिषदेतून जोरदार पलटवार केला.
ते म्हणाले यापूर्वी जरांगेचा रोख यापूर्वी छगनराव भुजबळ म्हणजे नाशिककडे होता,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता,परळीच्या मुंडे बंधु भगिणींवर होता पण आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रोच वळवला. मनोज जरांगेंना नक्की झालंय काय, त्यांची चिडचिड समजू शकतो. ते काल म्हणाले ज्यांची प्रमाणपत्र रद्द झाले त्यांचा मी उद्या समाचार घेणार. ज्यांची रद्द झाली त्यांच्यावर ते एक भ्र शब्दही बोलले नाहीत, असंही हाके म्हणाले.
पुढे बोलताना हाके म्हणाले, दहीहांडे यांचं प्रमाणपत्र रद्द झालं यावर, त्यांचा असा दावा आहे की दहीहंडे यांची नोंद सापडली तर तीन हजार दहीहांडेंना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहीजे, आज पर्यंत दावा करत होते की मी छावा आहे पण आजच्या पत्रकार परिषदेत बळीचा बकरा दिसले हे तेच बोलले मी नाही बोलत. प्रमाणपत्र इश्यू करणारी एक संस्था असते, आणि ती वैद्य ठरवणारी एक अर्धन्यायिक संस्था आहे. ओबीसी, एस्सी एसटी च्या लोकांनी प्रमाणपत्र रद्द झालं म्हणजे आम्ही बघून घेऊ असं कधी बोललो नाही. जरांगेचं आंदोलन आता राजकारणावर येऊन पोचल्याचा आरोपही हाके यांनी केला.
मनोज जरांगे आंदोलन उभं करून कोणाच्या तरी अजेंड्यावर दोन समाजात तेढ निर्माण करत होते. शिवसेनेच्या कार्यालयात आम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्याने नेऊन आमचा सत्कार केला. मनोज जरांगे म्हणतो की, हे लोकं तिथ कस काय आले.? मनोज जरांगेला एक सवाल आहे “तुझ्या बापाचं घर आहे शिवसेना भवन म्हणजे ” आम्ही ओबीसी बांधव आहोत. एकनाथराव शिंदे फक्त एका जातीचे नते आहेत का? मनोज जरांगे एकनाथराव शिंदेंचं नेतृत्व मर्यादेत का करतोय. एका समाजापुरतं मर्यादेत का करतोय. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते नाहीत का?, कार्यकर्ते नाहीत का.? मग ओबीसीच्या एखादा कार्यकर्ता त्यांच्या कार्यलयात गेला तर तुझ्या पोटात पोटसूळ उठायचं कारण काय? त्यामुळं ब्राम्हण समाजाचे आहेत, म्हणून देवेंद्र फडणवीस हे तुझे विरोधक होते आजपर्यंत असंही हाके म्हणाले.
एकनाथराव शिंदेच्या कार्यालयात एखादा ओबीसीचा कार्यकर्ता गेला म्हणून तु त्याला धारेवर धरणार. ओबीसींच्या मताचा अधिकार काढून घेतला की काय. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आता पुढं आलं पाहिजे आणि तुम्ही जे लाडून ठेवलेला लाडोबा आहे ना त्याला आता आरक्षण कोठून सुरू झालं हे त्याला एकदा समाजवून सांगितलं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रातलं समाजीक स्वास्थ.. आम्हाला प्रमाणपत्र मिळालं नाही. आरजकतेची भाषा बोलतोय हा माणुस, आम्ही बघुन घेण्याची भाषा बोलतो. मग मायक्रो ओबीसींना या महाराष्ट्रात राहायचं नाही का? जरांगेला राजकारण करायचं तर त्याने एका पक्षात जॉइन व्हावं किंवा एखादा पक्ष काढवा असंही ओबीसी नेते हाके यावेळी म्हणाले.



Comments