top of page

जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेसोमवारी हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?


आंतरवाली: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी (10 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 1वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसच्या प्रतीवर आझाद मैदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक ज्ञानेश आव्हाड यांची स्वाक्षरी आहे.


मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये “ भारतीय दंड संहिता,2023 कलम 35 (3) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, मी, खाली स्वाक्षरी करणारा, तुम्हाला निर्देश देतो की, भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम189(2),189(3),190,223(अ),123(2),271,272 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37(3),38,135, 136 अंतर्गत आझाद मैदान पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक 214/2025 च्या तपासादरम्यान, असा निष्कर्ष काढला आहे की तपासाशी संबंधित तथ्ये आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमची चौकशी करणे आवश्यक आणि योग्य आहे.”


त्यात पुढे लिहिले आहे की, “ म्हणून तुम्हाला 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. जेणेकरून तुम्ही सदर गुन्ह्याशी संबंधित आवश्यक तथ्ये सादर करू शकाल आणि तपासात सहाकर्य करू शकाल‘ग मनोज जरांगे पाटील यांच्यासह पोलिसांनी पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.


पोलिसांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आझाद मैदानात निदर्शनांच्या नियमांचे उल्लंघन केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचेही उल्लंघन केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुंबई पेालिस आता या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहेत.ज्यासाठी एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींचे जबाब नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.

Comments


bottom of page