जरांगे पाटील आंदोलनावर ठाम!, आंतरवारलीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही, मुंबईचं आंदोलन पाच टप्प्यात; मराठे आता वर्षा बंगल्यावरच येणार- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 2 min read

आंतरवाली : मराठा आरक्षणाच्या आमंलबजणीसाठी विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. उद्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील आंदोलन सुरू करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आंतरवाली सराटी, वडीगोद्री फाट्यावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पूर्व संध्येला जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाना साधला. राज्यभरातील मराठा समाजास अवाहन करत जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.
मराठा आरक्षणाच्या विविध मुद्यांवर जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. उद्या शनिवारी (दि.29) पासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिला असून आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनास्थळावर वाहनांच्या पार्किंगसह स्वच्छता, आरोग्य, पाणी, जेवनावळींच्या नियोजनार्थ गोदापट्ट्यातील 123 गावांच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी गुरूवारी (दि.27) आढावा घेतला. आंदोलनास काही तास शिल्लक असताना शुक्रवारी (दि.28) जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाना साधला.
जरांगे पाटील म्हणाले की, घराच्या चौकटींना ज्याप्रमाणे काळी बाहूली लटवलेली असते, तसे मंत्री विखे पाटील आमच्यावर लादले आहेत. सरकारने 58 लाख नोंदी कमी करण्याचं षडयंत्र रचलं आहे. पण मराठे हे कधीही यशस्वी होवू देणार नाहीत. मुंबईत येण्यापासून कोण रोखतं हे पाहू. आता मराठे वर्षा बंगल्यावरच येणार आहेत. मुंबईचं आंदोलन पाच टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात माझ्यासोबत 45 लाख वाहनं माझ्यासोबत येणार आहेत. गनिमी काव्यांनी मराठे मुंबईत घुसणार आहेत.
ईलब्ल्यूएस, एसईबीसीतून निवड झालेल्या मराठा युवकांना नियुक्त्या नाहीत. विद्यार्थ्यांना अद्याप सवलती दिल्या नाहीत. कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळण्या नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रावर अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतला त्यांचे प्रवेश पडताळणी अभावी रद्द झाले आहेत. आता एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही हे निर्णायक आंदोलन होणार आहे. मराठा एकजूटीने आंतरवालीकडे येत असल्याचंही जरांगे म्हणाले.
प्रत्येकवेळी शिष्ठमंडळांस मागण्यांचे निवेदन दिले आहे. केवळ निवेदन स्विकारायचे आणि त्यावर काही कार्यवाहीच नाही, असंच एकून चित्र आहे. 58 लाख नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र पडताळणीसह पाहिजेत, हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र कसे देणार ते आंतरवालीत येवून पडताळणी अधिकार्यांसमोर सांगावं, सातारा, कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटसह पुणे, औध आणि बॉम्बे गव्हरमेंटचे जीआर आणि आंमलबजावणी पाहिजे, इडब्ल्यूएस , एसईबीसीच्या सर्व सवलती पाहिजे, आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ नोकर्या देण्यात याव्यात, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, स्वतंत्र मराठा, कुणबी मंत्रालय स्थापन करण्यात यावं.
मराठा समाजासाठीच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत त्या सर्व चालू करण्यात याव्यात. ज्यामध्ये आण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचे आत्तापर्यंत थकितचे सर्व व्याज परतावे देण्यात यावेत. रद्द करण्यात आलेले चार प्रमाणपत्र पूर्वत करण्यात यावेत. यासह इतर मागण्यांचे निवेदन शिष्ठमंडळास सोमवारी (दि.24) दिले आहे.
मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांना आरक्षणातलं काहीच कळत नाही, त्यांना मी वारंवार सांगितले की वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेण्यापेक्षा तहसीलदार, उपविभागीय अधिकार्यांसह प्रमाणपत्र वाटपामध्ये संबधित अधिकार्यांसोबत बैठक घ्या, मात्र विखे पाटील केवळ जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेतात त्यामुळे आंमलबजावणीस दिरंगाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही सर्व मागण्यांची आंमलबजावणीच घेणार असल्याचंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आंतरवाली सराटीमध्ये जालना जिल्हा प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनातीत आहेत. शिवाय राज्य राखिव पोलिस दलाचे जवानही बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आले आहेत. आज दुपारपासूनच आंतरवालीच्या दिशेने वाहनांची रिघ लागली आहे.



Comments