top of page

झेरॉक्स दुकानात 3.5 एसआयआर फॉर्म; भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल आमदार रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी

नवी मुंबई: जिल्ह्यातील खारघरमध्ये एसआयआर फॉर्मवरून राजकीय राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एका झेरॉक्स दुकानात हजारो एसआयआर फॉर्म झेरॉक्स केले जात असल्याची माहिती मिळावल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी दुकानात धाव घेतल. यावेळी हे फॉर्म झेरॉक्ससाठी घेऊन आलेला व्यक्ती भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचे समोर आली. याप्रकरणी,4 बीएलओंना निलंबित करण्यात आलं असून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र यात केवळ बीएलओंना निलंबित करून भागणार नाही, तर त्यांना आदेश देणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.


खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात हजारो एसआयआर फॉर्म झेरॉक्स केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी दुकानात धाव घेतली. त्यावेळी, ठाकरे गट आणि भाजप पदाकिधार्‍यांमध्ये झटापट झाली. खारघर पोलिस या प्रकरणाची दखल घेत नसल्याने पोलिस ठाण्यात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन केले. अखेर भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच बीएलओ प्रतिनिधींना रायगड जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. भाजप कार्यकर्ता सुरज पाटील याच्याकडून 35 हजार एसआयआर अर्ज ताब्यात घेवून सील करण्यात आले आहेत.


या प्रकरणात 4 बीएलओ निलंबित केल्याचं कळतंय, पण फक्त बीएलओ यांना निलंबित करून भागणार नाही, तर त्यांना आदेश देणारे अधिकार कोण आहेत? तेही निलंबित झाले पाहिजेत आणि भाजप कार्यकर्त्यांवरही कारवाई झाली पाहिजे, पाहिजे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. महत्वाचं म्हणजे जागरूक नागरिकांमुळं हा प्रकार उघडकीस आला म्हणून लाजेखातर ही कारवाई केली असेल, पण असे अनेक प्रकार जे उघड झालेले नाहीत त्याचं काय? हाही प्रश्न आहे आणि तनिवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणीही रेाहित पवारांनी केली.

Comments


bottom of page