top of page

आहिल्यानगरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यावर हल्ला; नेवासा पोलिसात 100 जणांविरोधात गुन्हा

आहिल्यानगर : आहिल्यानगर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जिल्ह्यातील नेवासा येथे प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.27) सायंकाळी घडली. ज्ञाणेश्वर मंदिराकडे जाणर्‍या मार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी शेटे यांनी केली होती. याच रागातून अतिक्रम हटावणार्‍या पथकासोबत वाद झाल्यानंतर गणपती मंदिर परिसरातून जाणार्‍या ऋषिकेश शेटे यांच्यावर फळविक्रेते व जमावाने चाकूने वार करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली.


आहिल्यानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांनी नेवासा (जि. आहिल्यानगर) येथील ज्ञाणेश्वर मंदिरकडे जाणार्‍या मार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. शेटे यांच्या मागणीनुसार नेवासा स्थानिक प्रशासनाने गुरुवारी (दि.27) शहरातील ज्ञाणेश्वर मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. यावेळी एक जामाव शेटे यांच्या दिशेने आला आणि त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली या हल्ल्यात ऋषिकेश शेटे बालंबाल बचावले. या हिंसक घटनेप्रकरणी पोलिसांनी रात्रीच 90 ते 100 जणांवर गुन्हा दाखल केला असून 7 जणांना ताब्यात घेतले आहे.


घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळाला भेट देवून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखण्याचे आवाहन केले.


दरम्यान, नेवासा नगरपंचायत प्रशासनाकडून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. त्यावेळी काही फेरीवाल्यांनी त्याला तीव्र विरोध केला. या कारवाईदरम्यान ऋषिकेश शेटे यांची गाडी पथकाच्या पाठीमागून जात होती. त्यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज पसरला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी शेटे यांच्या गाडीची तोडफोड केली.


घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. नेवासा पोलिस ठाण्यात 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments


bottom of page